Konkan Railway Konkan Railway X Handle
गोवा

Konkan Railway Explained: भर पावसातही 680 कर्मचाऱ्यांचे पेट्रोलिंग; यंदा मान्सूनमध्ये रेल्वेचा प्रवास निर्विघ्न का होतोय?

Konkan Railway Monsoon 2024: तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांच्या सततच्या पेट्रोलिंगमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे.

Pramod Yadav

Konkan Railway Monsoon 2024 key Preparations

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या कोकण रेल्वेद्वारे दरवर्षी तीन कोटींपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. 1,891 पूल आणि 93 बोगद्यातून जाणारी कोकण रेल्वे दरवर्षी अनेक नैसर्गिक आव्हानाचा समाना करत असते.

पावसाळ्यात होणारे भूस्खलन, दरड किंवा झाडे कोसळण्याच्या घटना अथवा अपघाती घटनांमुळे बऱ्याचवेळा रेल्वे सेवा विस्कळीत होते. पण, गेल्या पंचवीस वर्षात अशा घटनांमध्ये ९९ टक्के घट झालीय. कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित झाल्याचे यातून दिसून येते.

एकीकडे सह्याद्री ते दुसरी अरबी समुद्र

तब्बल ७३९ किलोमीटर लांबीचा मार्ग असणारी कोकण रेल्वे महाराष्ट्रातून धावत पुढे गोवा आणि कर्नाटकातून जाते. मार्गावर ९१ बोगदे आणि १,८९१ पूल आहेत. यातील ७५० पूल महत्वाचे आणि मोठे आहेत. प्रवासातील २५ किलोमीटर लांबीचा मार्ग हा नदीवरुन जाणारा आहे.

कोकण रेल्वे मार्गावर ६८ धोकादायक ठिकाणं असून, यातील ५५ महाराष्ट्रात, सात गोव्यात आणि सहा ठिकाणं कर्नाटकात आहेत. तर, काळी नदीवरुन जाणारा पूल, वशिष्ठी नदीवरील पूल आणि सावित्री पूलावर दरवर्षी पूराचा धोका असतो. अनेक ठिकाणी डोंगरकापणी करुन आणि बोगद्यातून जाणारा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे.

कोकण रेल्वेची भौगोलिक परिस्थिती

लॉटेराईट माती आणि बेसॉल्ट खडक अशा भूप्रदेशातून कोकण रेल्वेचा मार्ग जातो. यातील ४३ टक्के मार्ग भूप्रदेशीय आव्हानांचा आहे. यात डोंगरकापणी जवळील लोहमार्ग आणि बोगद्यांचा समावेश आहे.

७३९ किलोमीटर मध्ये लाबंच्या मार्गावर असणाऱ्या ९१ बोगद्यापैकी ६२ बोगदे एकट्या रोहा आणि रत्नागिरीत आहेत. शिवाय या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद होत असते. दरवर्षी कोकणात ३,५०० मीमी ते ५००० मीमी पाऊस नोंदवला जातो.

मान्सूनमध्ये येणारी आव्हानं

कोकणात दरवर्षी मुसळधार पावसाची नोंद होत असल्याने, रेल्वेच्या ४१० किमी लोहमार्गावर पाण्यासह चिखल येण्याचा धोका उद्भवत असतो. नदीवरुन जाणाऱ्या पूलावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. दरड अथवा झाडे कोसळण्याची शक्यता किंवा बोगद्यात पाणी साठून किंवा चिखल आल्याने मार्ग बंद होण्याची शक्यता असते.

मान्सूनसाठी कशी तयारी केली जाते?

कोकण रेल्वे दरवर्षी मान्सूनसाठी विशेष तयारी करते. यासाठी विशेष निधीची देखील तरदूत केली जाते. मान्सूनसाठी चार महिन्यापूर्वीच तयारी सुरु करण्यात येते. कोकण रेल्वेला देखभालीसाठी दरवर्षी पाच ते सात कोटींचा निधी मिळतो. दर पावसाळ्यातील आवश्यक तयारीसाठी दहा कोटींचा अतिरिक्त निधी दिला जातो.

पावसाळ्यात लोहमार्गावर किंवा बोगद्यात पाणी साठणार नाही याची खबरदारी घेण्यात येते. यासाठी मार्गावरील स्वच्छता करण्यासह धोकादायक झाडे तोडली जातात.

जल भागातून जाणारा मार्ग व्यस्थित आहे का नाही याची पाहणी केली जाते. धोकादायक डोंगर भाग सपाट करुन कोसळणार नाही याची खबरदारी घेतली जाते. तसेच, दरड भागात मजबूत जाळी लावण्यात येते.

मार्गावर पेट्रोलिंगसाठी ६८० कर्मचारी तौनात करण्यात आले आहेत. सरासरी प्रत्येक किलोमीटरसाठी एक व्यक्ती मार्गावर तौनात असतो. संपूर्ण मार्गावर १४५ पेट्रोलिंग बिट्स आहेत. यातील महाराष्ट्र - ७८, गोवा - २१ आणि कर्नाटकात - ४६ बिट्स आहेत. यामुळे मार्गावर कोणतीही घटना घडल्यास तात्काळ सूचना देण्यास मदत होते.

तंत्रज्ञानाची मदत

१) कोकण रेल्वे मार्गावर वाऱ्याचा वेग तपासण्यासाठी विविध ठिकाणी अनेमोमीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. (रत्नागिरीतील पनवेल व्हायाडक्ट, मांडवी पूल, झुवारी पूल आणि शरावती पूल)

२) पूरसदृष्य भागात पूराची माहिती देण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आलीय.

३) एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने रेल्वे ट्रॅक मॉनिटर्रिंग आणि अलर्ट यंत्रणा केंद्राच्या वतीने तयार केली जात आहे.

४) हवामान विभाग आणि जलस्त्रोत विभागाच्या वतीने मुसळधार पाऊस व पूराची माहिती देणारी यंत्रणा निर्माण केली जातेय.

पावसाळ्यात वेळापत्रकात बदल

पावसाळ्यात कोकण रेल्वेच्या वतीने विशेष वेळापत्रक जाहीर केले जाते. याकाळात रेल्वेवर वेग मार्यादा लागू केली जाते. पावसाळ्यात ७५ ते ९० किमी प्रतितास वेगाने रेल्वे धावतात.

मुसळधार पावसात त्याचा वेग ४० किमी प्रतितास करण्याची परवानगी लोको पायलटला असते. त्यामुळे ट्रेनला नियमित वेळेपेक्षा थोडा विलंब होतो. तसेच, काही घटना घडल्यास नियोजित ट्रेन वळविण्याबाबत किंवा रद्द करण्याबाबत प्रवाशांना सूचित केले जाते.

अशी असते वेग मर्यादा

रोहा ते वीर - १२० किमी प्रतितास

वीर ते कणकवली - ७५ किमी प्रतितास

कणकवली ते उडुपी - ९० किमी प्रतितास

उडुपी ते ठोकूर - १२० किमी प्रतितास

इतर वेळी - १२० किमी प्रतितास

यंदा मान्सूनमध्ये सेवा विस्कळीत होण्याच्या दोनच घटना

या पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर आत्तापर्यंत दरड कोसळून तसेच, बोगद्यात पाणी साचल्याने सेवा विस्कळीत होण्याच्या दोन घटना घडल्या. रत्नागिरीत १४ जुलै रोजी दरड कोसळून मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली.

तर, १८ जुलै रोजी गोव्यातील पेडणे बोगद्यात रेल्वे मार्गावर चिखल मिश्रित पाणी आल्याने अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अनेकांच्या मार्गात बदल करण्यात आला. १९९८ मध्ये कोकण रेल्वे मार्गावर विविध प्रकारच्या दोनशे घटना घडल्या होत्या. आकडेवारी पाहता गेल्या २५ वर्षात कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात होणाऱ्या घटनांमध्ये ९९ टक्के कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT