Konkan Railway   Dainik Gomantak
गोवा

कोकण रेल्वेची बुधवारी गोव्यात बैठक, कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गाचा विषय निकाली निघणार का?

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात मंजूरी देण्यात आलेला कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्ग अद्याप कागदावरच आहे.

Pramod Yadav

Kolhapur Vaibhavwadi Konkan Railway Route

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात मंजूरी देण्यात आलेला कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्ग अद्याप कागदावरच आहे. 107 किमी या मार्गाचे दोनवेळा सर्व्हक्षण झाले मात्र, त्यावर पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.

दरम्यान, गोव्यात बुधवारी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन समितीची बैठक होणार असून यात कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्गाचा विषय अजेंड्यावर आहे. या बैठकीत या मार्गाचा विषय निकालात निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे दोनवेळा सर्व्हक्षण पार पडले, दरम्यान या मार्गात अनेक ठिकाणी चढउतार असल्याने यातील 27 किमीचे फेरसर्व्हक्षण केले जाणार आहे. सर्व्हक्षण झाल्यानंतर कामाची निविदा काढली जाईल असे मध्य रेल्वेच्या वतीने यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानंतर याबाबत पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याने, बुधवारी होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत प्रामुख्याने चर्चा होईल अशी माहिती आहे. तसेच. यावेळी या मार्गाचा विषय निकलात निघण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन सल्लागार समितीत कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि ललित गांधी सदस्य आहेत. महाडिक आणि गांधी यांनी कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्गाचा विषय अजेंड्यावर आणला आहे.

बुधवारी होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्ग लवकर पूर्ण होण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राच्या विकासासाठी हा मार्ग लवकर होणे आवश्यक असल्याचे ललित गांधी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT