Sunil Gudlar 
गोवा

Konkan Railway: लाचखोर PI सुनील गुडलर व हवालदार महम्मद हुसेन निलंबित

Margao Railway Police Station: मडगाव रेल्वे पोलिस स्थानकाच्या बाहेरच असलेल्या एसीबीच्या पथकाने छापा टाकून ही रक्कम गुडलरच्या टेबलच्या ड्रॉव्हरमधून जप्त केली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मडगाव रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक खंडणीबहाद्दर सुनील गुडलर व हवालदार महम्मद हुसेन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना अटक केल्याने आज त्या दोघांनाही पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले.

एसीबीने संशयित गुडलर याच्या उपस्थितीत तो राहत असलेल्या सांताक्रूझ येथील फ्लॅटची झडती घेतली तसेच बँकेतील खात्यातील आर्थिक व्यवहाराचीही माहिती जमा केली आहे. संशयित सुनील गुडलर याने बेळगावातील एका मटण व्यापाऱ्याला बेकायदा मांस वाहतूक प्रकरणात गुन्हा दाखल करून फसवण्याची धमकी दिली होती. हा गुन्हा नको असल्यास त्याला २ लाख रुपये रोख तसेच दरमहा २५ हजाराचा हप्ता देण्याची अट घातली होती.

एसीबीकडे तक्रार दाखल करून रेल्वे पोलिस स्थानकात जाऊन गुडलर याला दरमहाचा २५ हजाराचा हप्ता दिला. पोलिस स्थानकाच्या बाहेरच असलेल्या एसीबीच्या पथकाने छापा टाकून ही रक्कम गुडलरच्या टेबलच्या ड्रॉव्हरमधून जप्त केली होती. सध्या या दोघा संशयितांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. एसीबी पथकाने संशयितांच्या उपस्थितीत त्यांच्या घराची झाडाझडती सुरू केली आहे.

गुडलरची वादग्रस्त कारकीर्द

अवैध बीफ आणि लाच प्रकरणावरुन मडगाव कोकण रेल्‍वेचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर अडचणीत सापडले. याच प्रकरणात २०१० साली गुडलर अडकले होते. तब्‍बल १५ वर्षांनी त्‍याला पुन्‍हा अटक झाल्‍याने १५ वर्षांपूर्वीची ही केस पुन्‍हा एकदा चर्चेत आली. गुडलरला २५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्‍या पोलिसांनी रंगेहात पकडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT