Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

कोकण रेल्वे विद्युतीकरण मार्गाचे आज राष्ट्रार्पण

कोकण रेल्वेचा 741 किमीचा मार्ग : बंगळूर, उडपी, मडगावसह रत्नागिरीत कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने रोहा (महाराष्ट्र) ते थोकूर (कर्नाटक) या 741 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरण मार्गाचे राष्ट्रार्पण आज 20 जून रोजी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. प्रमुख कार्यक्रम बंगळूर येथे होईल, तर उडपी, मडगाव व रत्नागिरी स्थानकांवर खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मडगाव येथील कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खा. फ्रान्सिस सार्दिन, खा. विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, आ. दिगंबर कामत, मडगावच्या हंगामी नगराध्यक्ष दीपाली सावळ व कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन

विद्युतीकरण मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‍घाटन होणार आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर दुपारी 2.45 वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या विद्युतीकरण मार्गाच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. शिवाय उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मडगावहून रत्नागिरीला जाणाऱ्या विद्युतीकरण रेल्वे गाडीला हिरवा बावटा दाखविला जाईल.

1287 कोटींचा खर्च

नोव्हेंबर 2015 साली विद्युतीकरण कामाला सुरवात झाली होती. यासाठी 1287 कोटी रुपयांचा खर्च झाला असून 24 व 28 मार्च रोजी रत्नागिरी व थिवीत विद्युतीकरण केलेल्या मार्गाच्या सुरक्षिततेची चाचणी घेण्यात आली होती. शिवाय ही चाचणी सात टप्प्यांमध्ये करण्यात आली होती. मार्गाला सुरवात झाल्यानंतर कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला अंदाजे 150 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT