crocodile Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: तिखाजन - मये येथे मगरीचे दोन तुकडे, रेल्वे अंगावरुन गेल्याने अपघात झाल्याची शक्यता

Konkan Railway: रात्रीच्या सुमारास रेल्वे अंगावरुन गेल्याने मगरीचे दोन तुकडे झाले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Pramod Yadav

तिखाजन - मये येथे सुमारे दहा फूट लांब मगरीचे दोन तुकडे झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे अंगावरुन गेल्याने मगरीचे दोन तुकडे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी (दि.२९ जून) पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास तिखाजन - मये रेल्वे रुळांजवळ मगरीचे दोन तुकडे आढळून आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी भेट देत मृत मगरीचे तुकडे ताब्यात घेतले आहेत.

मगरीचा मृत कशामुळे झाला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, रात्रीच्या सुमारास रेल्वे अंगावरुन गेल्याने मगरीचे दोन तुकडे झाले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT