Kokum Farming Dainik Gomantak
गोवा

Kokum Farming: राज्यात कोकम उत्पादनात 40 टक्के घट! फळधारणेला उशीर; हवामान बदलांचा शेतकऱ्यांना फटका

Goa agriculture: कोकमाचा बाजारात भाव वाढला आहे, कारण, यंदा कोकम पिकात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाल्याचे अनुमान व्यक्त केले जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोमंतकीय खाद्यसंकृतीतील प्रमुख आहार शीतकढी- साईस, माशांचे हुमण करायचे म्हटले, की त्यात कोकम सोल हवे, शाकाहारी असो किंवा मांसाहारी जेवण असो. जेवणानंतर सोलकढी प्यायली नाही, तर जेवण पूर्ण होत नाही.

या कोकमाचा बाजारात भाव वाढला आहे, कारण, यंदा कोकम पिकात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाल्याचे अनुमान व्यक्त केले जात आहे. अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण आणि उष्णतेमुळे कोकम पिकात घट झाली आहे. कोकमच्या फळधारणेला उशीर झाला असून जरी येणाऱ्या काळात कोकम पीक चांगले आले तरी ते सुकवता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होईल.

मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा कोकम उत्पादनात घट झाली आहे. पूर्वी आम्ही कोकमची सोले बाजारात विक्रीसाठी घेऊन जायचो, परंतु यंदा तुटवडा असल्याने अनेकजन घरी येऊनच खरेदी करतात. दरवर्षी मिळणाऱ्या कोकमाच्या तुलनेत यंदा सुमारे ३५ ते ४० टक्के उत्पादनात घट झाली आहे.

- संजय कारबोटकर, कोकम उत्पादक.

यंदा कोकम फळधारणेला उशीर झाला आहे, त्यामुळे येत्या काळात कोकमचे पीक येईल, परंतु ड्रायरच्या सहाय्याने ती सुकविली, तरच सोले व इतर उत्पादन घेता येईल अन्यथा पावसामुळे सोले तयार करणे कठीण होईल.

- दत्तप्रसाद देसाई, उपसंचालक, कृषी संचालनालय.

दरही वाढले!

अनियमित थंडी आणि त्यानंतरचा प्रचंड उष्मा, ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्यात असतानाच फळांची गळती यामुळे कोकम पिकात घट झाली आहे.

उत्पादनात घट झाल्याने आगळ आणि कोकम सोलाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पणजी बाजारात हजार रुपये प्रती किलो दराने विक्री केली जात आहे.

कोकम उत्पादनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना देखील उत्पादन घटल्याने फटका बसला आहे.

राज्यातील कोकम लागवडीखालील क्षेत्रफळ व उत्पादन

वर्ष क्षेत्रफळ उत्पादन

२०२४-२५ ८६४६ ८३०

२०२३-२४ ८६७४ ८२४

२०२२-२३ ९३१९ ८४८

२०२१-२२ ८९३३ ७९५

२०२०-२१ ९२५८ ८२४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT