Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्पवीयन मुलांवर सुरी हल्ला; संशयितास मयडे येथून अटक

Goa Crime News: केस कापायला जाणार्‍या पंधरा वर्षीय मुलासह त्याच्या अल्पवयीन मित्रावर क्षुल्लक कारणावरुन सुरी हल्ला करून त्यांना शिवीगाळ केली

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: केस कापायला जाणार्‍या पंधरा वर्षीय मुलासह त्याच्या अल्पवयीन मित्रावर क्षुल्लक कारणावरुन सुरी हल्ला करून त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी नास्नोळा येथील शशिकांत (शेशलो) म्हावळणकर (५९) यास सोमवारी मयडे येथून शिताफीने अटक केली.

संशयिताविरुद्ध म्हापसा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४, ३२४, ५०६(२) व गोवा बाल कायद्याच्या कलम ८च्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

याप्रकरणी पीडित मुलाचे वडील रमेश नाईक हे तक्रारदार आहेत. पीडित मुलगा व त्याचा मित्र संशयिताच्या घराजवळ आपल्या आणखी एका मित्रास बोलविण्यासाठी गेले होते.

हा मित्र संशयिताच्या घरीच भाडोत्री म्हणून राहायला असतो. हे तिघेही मित्र सोबतच केस कापण्यासाठी जाणार होते.

यावेळी क्षुल्लक कारणास्तव संशयिताने पीडितास व त्याच्या मित्रास शिवीगाळ केली. त्यानंतर, संशयिताने या दोन्ही अल्पवयीन मुलांवर सुरी हल्ला करुन त्यांना मारण्यासाठी त्यांचा पाठलाग केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT