Knife attack in ponda over property dispute Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गुन्हेगारीच्या विळख्यात गोवा! मालमत्तेच्या वादातून फोंड्यात चाकू हल्ला

शेख मैनुद्दीन तंदूर यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी नाझरुद्दीन तंदूर आणि अब्दुल जमीर तंदूर यांना अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्यातील वाढती गुन्हेगारी व ड्रग्‍सविक्रीचा सुळसुळाट, यामुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ लागले आहे. शेख मैनुद्दीन तंदूर यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी नाझरुद्दीन तंदूर आणि अब्दुल जमीर तंदूर यांना अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

(Knife attack in ponda over property dispute)

राज्यातील वाढती गुन्हेगारी व ड्रग्‍सविक्रीचा सुळसुळाट, यामुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ लागल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेत पोलिस मुख्यालयात पोलिस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ड्रग्स व्यवसायाचा नायनाट करण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत. पर्यटनस्थळाबरोबरच गोवा हे ड्रग्सविक्री केंद्र म्हणून नावारुपास आल्याने सरकारने ड्रग्‍सचा व्यवसायच मोडून काढण्यास ठोस पावले उचलली आहेत.

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सरकारने केली मोठी घोषणा

गोवा सरकारने राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोमंतकीयांना आता घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा सरकार पोलीस समर्पित एक मोबाइल अॅप्लिकेशन लॉन्च करणार आहे. त्याच्यावरुन घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. आमदार केदार नाईक आणि पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या उपस्थितीत आज पणजी येथील पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT