King Cobra Rescue Sattari Goa Dainik Gomantak
गोवा

VIDEO: घरात शिरला चक्क 16 फुटी किंग कोब्रा! असोडे-सत्तरी येथे घरात शिरलेल्या महाकाय सापाला प्राणिमित्राकडून जीवदान

King Cobra Rescue Sattari Goa: खोतोडा पंचायत क्षेत्रातील असोडे-सत्तरी येथे भरवस्तीत शिरलेल्या तब्बल १६ फूट लांबीच्या किंग कोब्राचे यशस्वी रेस्क्यू करून प्राणिमित्र प्रदीप गवंडळकर यांनी आपल्या धाडसाची आणि प्राणिप्रेमाची प्रचीती दिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: खोतोडा पंचायत क्षेत्रातील असोडे-सत्तरी येथे भरवस्तीत शिरलेल्या तब्बल १६ फूट लांबीच्या किंग कोब्राचे यशस्वी रेस्क्यू करून प्राणिमित्र प्रदीप गवंडळकर यांनी आपल्या धाडसाची आणि प्राणिप्रेमाची प्रचीती दिली. सुभाष गावकर यांच्या घरात हा भला मोठा साप आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच प्रदीप गवंडळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरात शिरलेल्या किंग कोब्राला पाहून घरातील सदस्यांसह शेजारील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. सापाचा आकार मोठा असल्याने त्याला पकडताना विशेष खबरदारी घेण्यात आली. प्रथम सापाला घराबाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर सुरक्षितरीत्या पकडण्यात यश आले.

सुमारे १६ फूट लांबीचा आणि अंदाजे ३० किलो वजनाचा हा किंग कोब्रा असल्याचे सांगण्यात आले. रेस्क्यू मोहिमेदरम्यान वन खात्याचे रेस्क्युवर समीर अस्नोडकर हेही उपस्थित होते. पकडलेल्या सापाला पुढील कार्यवाहीसाठी वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले.

९०हून अधिक सापांचे रेस्क्यू

प्रदीप गवंडळकर हे सत्तरी तालुक्यातील परिचित प्राणिमित्र असून आतापर्यंत त्यांनी ९० हून अधिक सापांचे यशस्वी रेस्क्यू केले आहे. केवळ सापच नव्हे तर विविध वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठीही ते सातत्याने कार्यरत आहेत. गेल्या आठ दिवसांत त्यांनी लहान-मोठे मिळून १० साप सुरक्षित पकडले असून त्यामध्ये हा किंग कोब्रा सर्वात मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT