Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: खंडणीसाठी तरुणाचे अपहरण, बेदम मारहाण

मांडवीवरील कॅसिनोवर गेलेल्या हैदराबादच्या एका तरुणाचे खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना पणजी पोलिसांनी अटक केली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: मांडवीवरील कॅसिनोवर गेलेल्या हैदराबाद येथील शेख कादर बाशा (32) याचे अपहरण करून व त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून त्याच्या पत्नीकडे 90 हजारांची खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना पणजी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील इतर चौघे फरारी आहेत.

अबुझर गफार कोतवाल (42, सांकवाळ), रमेश सीताराम सतरंगी (32, पणजी) व सिंधू मुकेश पसवार (22, ताळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गणेश पंजल व उल्हास तसेच इतर दोघेजण फरारी आहेत. पर्यटनासाठी आलेला तक्रारदार शेख कादर बाशा हा रविवारी सकाळी एका कॅसिनोमध्ये गेला होता.

तेथून त्याला दोघांनी जबरदस्तीने बसवून मिरामार येथील उद्यानात नेले. तेथे आणखी पाचजण येथे आले.

त्यांनी त्याला मारहाण करत त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला. यावर पत्नीने पैसे पाठविण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वेळ मागितली.

या दरम्यान तिने पणजी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित बाशा याचे मोबाईल लोकेशन काढून कामराभाट-करंझाळे येथून त्याची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT