<div class="paragraphs"><p>kidnapping</p></div>

kidnapping

 
गोवा

कुळण येथील परिचारिकेचे अपहरण?

Dainik Gomantak

डिचोली :

डिचोलीतील कुळण-सर्वण येथील परिचारिका सौ. अल्पना अविनाश मायणीकर (४४ वर्षे) या राहत्या घरातून बेपत्ता झाल्‍या असून, त्‍यांचे अपहरण झाल्‍याचा दावा त्‍यांच्‍या कुटुंबियांनी केला आहे. तशी तक्रारही अल्पना यांच्‍या कुटुंबियांनी डिचोली पोलिस स्थानकात नोंदवली आहे. मालमत्तेच्या प्रकरणातून त्‍यांचे अपहरण केले असावे, असा संशय कुटुंबियांनी व्यक्‍त करून या प्रकरणात कुडणे-साखळी येथील सहाजणांचा हात असावा, असे तक्रारीत नमूद केले आहे. सहाही संशयितांची नावेही तक्रारीत नमूद केली आहेत. त्यामुळे अल्पना यांच्‍या बेपत्ता प्रकरणी गूढ निर्माण झाले आहे.

राहत्‍या घरातून गायब...

पार्वतीनगर, कुळण-सर्वण येथील आधार हॉस्पिटलच्या मागील बाजूने राहणाऱ्या सौ. अल्पना मायणीकर या म्हापसा येथील आझिलो हॉस्पिटलमध्‍ये स्टाफ नर्स म्हणून कामाला आहेत. शनिवारी दुपारपर्यंत अल्पना आपल्या बंगल्यात होत्या. त्यावेळी मुले बंगल्यात खेळत होती. थोड्यावेळाने साधारण दुपारी तीन वाजता आपली मम्मी बंगल्यात नसल्याचे मुलांच्या लक्षात आले. त्‍यांची पर्स, मोबाईल आणि चप्पल घरातच होती. मुलांनी त्‍वरित वडिलांशी संपर्क साधला. नंतर अल्पना यांच्‍या कुडणे येथील माहेरची मंडळी आली आणि त्‍यांचा सर्वत्र शोध सुरू झाला. नातेवाईकांकडे संपर्क साधला, तरी अल्पना यांचा रात्रीपर्यंत थांगपत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा अल्पना बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी डिचोली पोलिसांत दिली.

अडथळा नको म्‍हणून कृत्‍य?

अल्पना यांचे अपहरण झाले असावे, असा संशय व्यक्‍त करून तिच्या कुटुंबियांनी आज (रविवारी) सायंकाळी पोलिस स्थानकात तशी तक्रार दिली आहे. कुडणे-साखळी येथील आमची मालमत्ता हडप करण्याचे प्रयत्न कुटुंबियांतीलच काहीजणांकडून सुरू आहेत. या मालमत्तेसंबंधी अल्पना सदैव चौकस असायच्‍या. तिचा अडथळा नको, या हेतूनेच अल्पना हिचे अपहरण केले असावे, असा संशय अल्पना यांचा भाऊ नवनाथ मांद्रेकर आणि बहिणीने केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

SCROLL FOR NEXT