Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जीव भांड्यात पडला! तब्बल 8 तासांच्या शोधमोहिमेनंतर जंगलात सापडला अपहरण झालेला चिमुरडा...

केपे पोलिसांची कामगिरी; नातेवाईकांपैकीच एकाने केले होते अपहरण

Akshay Nirmale

Goa Crime: नात्यातीलच एका 7 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याच्या आरोपावरून केपे पोलिसांनी बसुराज कित्तूर याला अटक केली आहे. तो मूळचा कर्नाटकचा आहे. कित्तूर याच्या महिला नातेवाईकानेच याबाबत तक्रार दिली होती.

बसुराज कित्तूर हा मूळचा कर्नाटकचा रहिवाशी आहे. त्याची नातेवाईक शिल्पा सागर प्रसाद (मूळ राहणार घोटमंडी) यांनी याबाबत तक्रार दिली होती. वाईट उद्देशाने त्याने मुलाचे अपहरण केल्याचे शिल्पा प्रसाद यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली होती.

पोलिसांनी अपहृत मुलाचा शोध घेण्यास सुरवात केली. सुमारे 8 तास शिरवई, तिळामळ येथील जंगलात पोलिसांचे पथक शोध घेत होते. पोलिस निरीक्षक वैभव धनंज यांनी या पथकाचे नेतृत्व केले. या शोधात बसुराज कित्तूर हा अपहरण केलेल्या मुलासह आढळून आला.

पोलिसांनी कित्तूर याला अटक करत संबंधित लहान मुलाची सुटका केली आहे. या मुलाकडून पोलिस माहिती घेतली असून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान, केपे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरात त्यांचे कौतूक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT