Nevra Grande Khazan Land  Dainik Gomantak
गोवा

Nevra Grande: नेवरा येथे खाजन शेतीत पुन्हा पाणी! नाराज शेतकऱ्यांची प्रशासनावर जोरदार टीका

Nevra Grande Khazan Land: नेवरा ओ ग्रांद येथील खाजन शेती जमिनीत पुन्हा एकदा नदीचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा प्रकार वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Nevra Grande Khazan Land River Water Flood ISsue

तिसवाडी: नेवरा ओ ग्रांद येथील खाजन शेती जमिनीत पुन्हा एकदा नदीचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा प्रकार वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास खाजन शेती जमीन कधीच पूर्ववत होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी याच खाजनातील शेतीत अशाच प्रकारे नदीचे पाणी घेऊन बुडवण्यात आली होती. तेव्हा वृत्तपत्रांनी यावर प्रकाश टाकल्यानंतर तिसवाडी मामलेदारांनी कारवाई करत दोन मानस ठेकेदारांना नोटीस बजावली होती. परंतु हा प्रकार नित्याचा झाल्याने प्रशासनाची धास्ती नसल्याची दिसते. पाणी शिरून शेती नष्ट झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी सांतआंद्रेतील समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात शेतकरी संघटनेचे सदस्यांनी आमदार विरेश बोरकर यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नसल्याची टीका केली होती, तसेच नेवरा ओ ग्रांद खाजनातील शेती जमिनीत शिरलेले नदीचे पाणी देखील त्यांनी दाखवले होते. खासकरून तिसवाडी मामलेदार कार्यालयावर टीकास्त्र सोडले होते.

खाजन शेतीचा विषय सांतआंद्रेत पुन्हा ऐरणीवर आल्याने प्रशासनाला यावर तोडगा काढणे शक्य नाही की याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात नाही, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सरकारकडून विविध आश्वासने दिली जात असली तरी ती केवळ तोंडी राहिल्याची टीका शेतकरी करत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाजन समस्येवर तोडगा काढण्यासाठी ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, परंतु नेवरा, करमळी खाजनातील बांध बांधण्यासाठी सुमारे ३०० कोटीहून अधिक निधी लागणार आहे. त्याशिवाय आमदार विरेश बोरकर यांनी मानस लिलाव प्रक्रिया स्थगित करून पुढे ढकलण्याची मागणी करूनही ती मामलेदार कार्यालयाने मान्य केली नाही. त्यामुळे सरकारकडून आवश्यक पावले घेतली जाणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
-रामराव वाघ, अध्यक्ष, खाजन ऍक्शन समिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT