Goa Monsoon Update 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: खांडेपार नदीला पूर; रस्ता पाण्याखाली गेल्याने डोंगरातून नागरिकांची वाटचाल

पूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update 2023 : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून ग्रामीण तसेच शहरी भागातील रस्त्यांवर पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आज सकाळपासून धारबांदोडा तालुका पंचायत क्षेत्रातील धावकोण गावात जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने गावातील लोकांना डोंगरातून वाट काढत मुख्य रस्ता पार करावा लागत आहे.

गेल्यावर्षी मुख्यमंत्री यांनी आमदार डॉ.गणेश गावकर यांच्यासह धावकोण गावात भेट दिली होती. तेव्हा हा रस्ता पाण्याखाली जात असल्याने धावकोण गावातील लोकांसाठी डोंगर माथ्यावरुन रस्ता तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते.

पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची हालचाल सरकारने केली नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, परवा अशीच एक घटना घडली होती. पावसाची संततधार सुरु असल्याने गोवा बेळगाव महामार्गावर पूलाचा भाग खचल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी बेळगाव ते गोव्यादरम्यानच्या चोर्ला घाटात कंटेनर व प्रवासी बस यांच्यात अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT