Khandepar Brige : Dainik Gomant
गोवा

Khandepar Brige : तब्बल 5 वर्षांनी जोडरस्ता कामाला मुहूर्त; वाहतूक होणार सुरळीत

Khandepar Brige : खांडेपार पुलाच्या कुर्टी भागाकडील संलग्न रस्त्याचे काम

गोमन्तक डिजिटल टीम

Khandepar Brige : फोंडा व उसगावला जोडणाऱ्या महत्त्वाच्या खांडेपार येथील नवीन पुलाच्या कुर्टी भागाकडील जोडरस्त्याचे काम सुरू होण्यासाठी तब्बल पाच वर्षे लागली. गेल्या महिन्यात हे काम आता सुरू करण्यात आले आहे.

या जोडरस्त्यामुळे खांडेपार येथील वाहतूक सुरळीत होणार आहे. या जोडरस्त्याबरोबरच शापूर - फोंड्यातील अंडरपासचे कामही सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ११६ कोटी रुपये केंद्रीय रस्ते महामार्ग खात्यातर्फे मंजूर करण्यात आले आहेत.

खांडेपार येथील जुना पूल वाहतुकीसाठी एकेरी केल्याने या पुलावर तसेच खांडेपार बाजार भागात कायम वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे नवीन खांडेपार पुलाची गरज निर्माण झाली होती. मोले ते फोंडापर्यंतच्या चौपदरी महामार्ग दरम्यान खांडेपार येथे सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाचा नवीन पूल उभारण्यात आला, पण या पुलाच्या खांडेपार भागाकडील जोडरस्त्याचे काम अपूर्ण राहिले.

या जोडरस्त्याच्या कामात एक जुने घर येत असल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यामुळे उशीर झाला असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सांगतात.

या घराचे प्रकरण मिटल्यानंतरच कामाला सुरवात करण्यात आली, त्यातच निधी मंजुरीसाठी आवश्‍यक सोपस्कार करताना थोडा उशीर लागल्याने हे काम उशिरा सुरू झाले असले तरी येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मुदत देण्यात आली आहे.

खांडेपार येथील नवीन पुलाचे उद्घाटन २२ डिसेंबर २०१८ ला झाले होते. पण नंतरच्या काळात आलेल्या अडचणींमुळे हे काम तब्बल पाच वर्षे रखडले. आता पाच वर्षांनी हे काम सुरू करण्यात आले आहे.

सुदिन, रवींकडून पुलासाठी पाठपुरावा!

मंत्री सुदिन ढवळीकर व रवी नाईक यांनी नवीन खांडेपार पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहकार्य तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना मिळाल्याने या पुलाच्या कामाला चालना मिळाली होती.

११६ कोटी रुपये मंजूर

खांडेपार येथील जोडरस्त्यासह शापूर - बांदोडा येथील नवीन भुयारी मार्गाचे काम तसेच खांडेपार येथील काही शिल्लक कामासाठी केंद्र सरकारच्या रस्ते महामार्ग खात्यातर्फे ११६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दीड वर्षात ही कामे पूर्ण करण्यात येणार असून पूर्वीच्याच राव कंपनीतर्फे हे काम निविदेची अंदाजित रक्कम कमी करीत काम मिळवले आहे.

वाहतूक कोंडीची समस्या मिटली

खांडेपार येथील जुन्या पुलामुळे वाहतुकीची कायम कोंडी होत असे. विशेषतः सकाळी, दुपारी व संध्याकाळच्या वेळी वाहनांची मोठी रांग लागायची.

नवीन खांडेपार पुलाचा जोडरस्ता पूर्ण झाला नसल्याने सर्विस रोडवरून वाहतूक सुरू करण्यात आली, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मिटली, मात्र वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. आता या पुलाचा जोडरस्ता पूर्ण होणार असल्याने वाहतूक सुरळीत होईल, असे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT