Khadaki Sattari Fire News Dainik Gomantak
गोवा

Sattari Fire News: खडकीत आगीचे थैमान! घराचे मोठे नुकसान Watch Video

Khadaki Sattari Fire News: सत्तरी तालुक्यातील खडकी येथे श्रीराम मंदिराजवळ अनिल नाईक यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यातील खडकी येथे श्रीराम मंदिराजवळ अनिल नाईक यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

आगीची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत घरातील साहित्य तसेच घराच्या काही भागाचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मात्र, एकूण किती आर्थिक नुकसान झाले याची नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. या मदतकार्यात अग्निशमन दलाचे ज्ञानेश्वर गावस यांच्या मार्गदर्शनाखाली आदम खान, सत्यवान गावस, रूपेश सालेलकर, साईनाथ सावंत, दत्ताराम देसाई, महादेव गावडे, उमेश गावकर आणि संदीप गावकर यांनी सहभाग घेतला.

मडगाव पोलिसांची परप्रांतीयांवर कारवाई

मडगाव पोलिसांनी अनोळखी परप्रांतीय कामगारांवर कारवाई सुरू केली असून, वीसजणांना ताब्यात घेतले आहे. प्रत्येक आठवड्याला ही मोहीम सुरू राहणार आहे. मूळ मालकांनी या कामगारांचे फॉर्म भरावेत, असे आवाहन मडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी केले आहे. आज कारवाई केलेले कामगार हे रोकडा कामगार आहेत. मडगाव पालिका उद्यान, खारेबांद व रावणफोंड येथे ते उभे असतात. त्यांच्याकडे कुठलीही ओळखपत्रे नाहीत. जे या लोकांना भाड्याने ठेवतात त्यांनी भाडेकरू अर्ज भरण्याची गरज आहे. अर्ज न भरल्यास कायद्याने सहा महिने कैद व दहा हजार रुपयांचा दंड आहे, असेही गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT