Fatorda News : फातोर्डा केळशी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना त्रास देणाऱ्या फेरीवाल्यांना कोलवा पोलिसांनी ताब्यात घेतले.
यात दोन फेरीवाल्या महिलांचा समावेश आहे . बीचवर स्थलांतरित फेरीवाल्यांची पुन्हा आपले डोके वर काढल्याचे केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले पर्यटन हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून पर्यटकांना त्रास देणाऱ्या या फेरी विक्रेत्यांना पकडण्यासाठी पंचायतीने खासगी सुरक्षा नेमून त्यांच्यावर कारवाईसंदर्भात पावले उचललेली आहेत.
किनारी फेरीवाले दिसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी कोलवा पोलिस पथक व पिंक फोर्सचे पोलीस पथक पाठविण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.