Kazakh Dancer Kristina Dainik Gomantak
गोवा

Aropra Nightclub Fire: रोमिओ लेन प्रकरणात 'बेली डान्सर' अडकली! केलं कायद्याचं उल्लंघन; क्रिस्टीनाला 'काम' करण्याची परवानगी नव्हती?

Kazakh Dancer Kristina Visa Issue: या दुर्घटनेच्या वेळी क्लबमध्ये नृत्य सादर करणारी कझाक नागरिक क्रिस्टीना आता तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे

Akshata Chhatre

Kristina Kazakh Dancer News: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमधील भीषण अग्नितांडवामध्ये २५ निष्पाप लोकांचा बळी घेतल्यानंतर, या प्रकरणाचा तपास आता एका नवीन आणि महत्त्वपूर्ण दिशेने सुरू झाला आहे. या दुर्घटनेच्या वेळी क्लबमध्ये नृत्य सादर करणारी कझाक नागरिक क्रिस्टीना आता तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे.

'मेहुबुबा मेहुबुबा' नृत्यानंतर लगेचच आग

या दुर्घटनेच्या रात्रीचे व्हायरल झालेले व्हिडिओ तपास यंत्रणांनी तपासले आहेत. त्या फुटेजमध्ये क्रिस्टीना ही 'मेहुबुबा मेहुबुबा' या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. आणि तिचे नृत्य संपण्याच्या काही क्षणांतच क्लबच्या छतावरून अचानक आगीच्या ज्वाला भडकल्याचे स्पष्ट दिसतेय. क्रिस्टीना या आगीतून बचावली.

व्हिसा नियमांचे उल्लंघन?

क्रिस्टीनावर संशय येण्याचे मुख्य कारण म्हणजे तिचा व्हिसा आणि भारतातील व्यावसायिक कामकाज. परदेशी नागरिक प्रादेशिक नोंदणी कार्यालयाच्या (FRRO) एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टीनाने बिझनेस व्हिसासाठी (Business Visa) अर्ज केला होता, पण त्याला अद्याप मंजुरी मिळाली नव्हती.

व्हिसा मंजूर नसताना, क्रिस्टीनाला भारतात व्यावसायिक नृत्य सादरीकरण करण्यास किंवा काम करण्यास परवानगी नाही. त्यामुळे ती परवान्याशिवाय भारतात काम करत होती का, याचा तपास एफआरआरओ करत आहे. एफआरआरओचे अधीक्षक अर्षी आदिल यांनी पीटीआयला सांगितले की, ती बिझनेस व्हिसावर होती की नाही, याची चौकशी सुरू आहे.

मुख्य आरोपी विदेशात पसार, इंटरपोलची मदत

या क्लबचे मुख्य मालक सौरभ आणि गौरव लुथरा हे घटनेच्या काही तासांतच थायलंडमधील फुकेट येथे पळून गेले असून, त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांनी इंटरपोलची 'ब्ल्यू नोटीस' जारी केली आहे. क्लबचे भागीदार आणि दिल्लीतील बिल्डरचा भाऊ असलेल्या अजय गुप्ता याला नवी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले असून तो 'गोगी टोळी'शी संबंधित असलेल्या 'काळ्या पैशाची' गुंतवणूक क्लबमध्ये करत होता, असा पोलिसांना संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: बेकायदा नाईटक्लबवर कारवाई न करणं पडलं महागात, हडफडे पंचायतीच्या सचिवाची सेवेतून केली हकालपट्टी; गोवा सरकारचा मोठा दणका

सारा तेंडुलकरच्या हातातील 'त्या' बाटलीवरुन सोशल मीडियावर गदारोळ! गोव्यातील व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सचिनच्या लेकीला केलं ट्रोल VIDEO

Bollywood: 2025 गाजवले छावा, धुरंधरने! सलमानसह अनेक स्टार्सचे सिनेमे फ्लॉप; वाचा 'या' वर्षाचा बॉलिवूडचा आलेख

परंपरेच्या नावाखाली निष्पापांचा बळी! खतना विधीदरम्यान 41 तरुणांचा मृत्यू, पालकांच्या हलगर्जीपणावर संतापले मंत्री; 41 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जर्मनीत बँकेची भिंत फोडून चोरी केले 290 कोटी रुपये; ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये केला होता मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT