Shankhasur Kala Goa Canva
गोवा

Shankhasur Kala Goa: शंखासुराची जुगलबंदी आणि मुखवट्यांनी रंगणारा कालोत्सव

Goa Kalotsav: काला हा एक लोकनाट्य प्रकार आहे. यात मुखवटेधारी पात्रे वेगवेगळी पौराणिक पात्रे सादर करून लोकरंजन करतात.काणकोणच्या वेगवेगळ्या देवालयांत कार्तिक महिन्यात कालोत्सव साजरा झाला. या कालोत्सवात शंखासुर काल्याचे आयोजन करण्यात येते.

गोमन्तक डिजिटल टीम

Kalotsav Shankhasaur Kala In Kartik Month

सुभाष महाले

काला हा एक लोकनाट्य प्रकार आहे. यात मुखवटेधारी पात्रे वेगवेगळी पौराणिक पात्रे सादर करून लोकरंजन करतात.काणकोणच्या वेगवेगळ्या देवालयांत कार्तिक महिन्यात कालोत्सव साजरा झाला. या कालोत्सवात शंखासुर काल्याचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी काही देवालयांत वेगवेगळी भूमिका साकारण्यासाठी लागणारे मुखवटे परंपरेने तयार आहेत.

पैंगीण येथील श्री वेताळ देवालय, पणसखंडे येथील श्री व्यंकटेश देवालय, तसेच मल्लिकार्जुन देवालयांतून अशा प्रकारचे मुखवटे आहेत. हे मुखवटे लाकडाचे असून दाबण या टणक लाकडापासून हे टिकाऊ मुखवटे तयार केलेले आहेत. ते रंगारीकडून हुबेहूब सुशोभित केले जातात. त्यामध्ये श्री गणेशाचा प्रमुख मुखवटा असतो. पेरणी जागांमध्येही हे मुखवटे वापरले जातात.

त्याचप्रमाणे कुड्डमाती, हुड्डमाती भट, म्हातारी, पुतना, श्रीकृष्ण असे मुखवटे असतात. शंखासूर काल्यात सूत्रधार अर्थात हरदास यांची प्रमुख भूमिका असते. हरदास शंखासुर काल्याला श्री गणेशाचा धावा करून सुरुवात करतो. श्री गणेश पूजन एका आगळ्या पद्धतीने झाल्यानंतर एकामागोमाग एक पात्रे येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

शंखासुराच्या कथानकाभोवती हा कालो फिरत असतो. त्यात आख्यान असते. पुतना श्रीकृष्णाचा वध करण्याच्या इराद्याने त्याला स्तनपान करते. मात्र, त्यावेळी श्रीकृष्ण पुतनाचा वध करतो. त्यानंतर शंखासुराचे आगमन होते. कापडी मुखवटा व काळा वेष परिधान करून तो प्रवेश करून हैदोस घालतो. त्याच्यासोबत दिवटी धारक असतो. हरदास त्याला वेगवेगळी प्रलोभने दाखवून भुलवून ठेवतो. काला हा लोकनाट्याचा प्रकार असून परंपरेने देवालयात लोक करमणूक म्हणून काला हा लोकनाट्य प्रकार आजही काणकोणात तग धरून आहे. पखवाज, टाळ व हार्मोनियम या वाद्यांच्या सहाय्याने हा काला सादर केला जातो.

लक्ष्मीनारायण देवालयात काला....

पैंगीण येथील श्री लक्ष्मीनारायण देवालयात कार्तिकी पोर्णिमेनिमित्त शंखासूर काल्याचे आयोजन केले होते. सकाळी श्री लक्ष्मीनारायण देवालयाच्या लालखीची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर देवालयाच्या प्राकारात वनभोजनाचा विधी झाला. त्यानंतर संध्याकाळी श्री सिद्धेश्वर देवालयापासून मिरवणूकीने श्रीचे आगमन श्री लक्ष्मीनारायण देवालयात झाले. त्यानंतर काल्याचे सादरीकरण झाले. त्यात निशिकांत टेंग्से यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली. सुजय पागी, नेहार कोमरपंत यांनी पखवाज साथ केली.रूपेश पैंगीणकर यांनी शंखासुराचे पात्र साकारले. त्याशिवाय व्यंकटराय नाईक,मुकेश नाईक, अशोक पागी, विशाल नाईक, राहुल कुडतरकर, अशोक पागी व अन्य कलाकारांनी वेगवेगळी पात्रे सादर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT