Illegal Fishing  Dainik Gomantak
गोवा

Illegal Fishing Trawlers: कर्नाटकच्या ट्राॅलर्सची गोव्याच्या हद्दीत घुसखोरी, 2 वर्षांत 10 गुन्हे; 14.80 लाखांचा दंड वसूल

Illegal Fishing Activities in Goa by Karnataka Trawlers: कर्नाटकातले ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत प्रवेश करून बेकायदा मासेमारी करीत असल्याचे प्रकार हल्‍ली वाढले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कर्नाटकातले ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत प्रवेश करून बेकायदा मासेमारी करीत असल्याचे प्रकार हल्‍ली वाढले आहेत. मागच्‍या दोन वर्षांत अशी बेकायदेेशीर मासेमारी करणाऱ्या दहा ट्रॉलर्सवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्‍यांच्‍याकडून १४.८० लाख रुपये दंड वसूल केला.

लोकसभेत खासदार विरियातो फर्नांडिस यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली. सरकारने कर्नाटकातील १० ट्रॉलर्सवर गुन्हे दाखल केले आहेत आणि २०२२ ते २०२४ या कालावधीत १४ लाख ८० हजार रुपये रुपयांचा दंड ठोठावला, असे केंद्रीय मासेमारी आणि पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आपल्‍या उत्तरात म्‍हटले आहे.

बुल ट्रॉलिंग, एलईडी मासेमारी तसेच परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी याबद्दल विरियातो यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सागरी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना संबंधित आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या मासेमारी ट्रॉलर्सची नोंदणी किंवा परवाना तात्पुरते निलंबित करण्याचे, वारंवार उल्लंघन करणाऱ्या अशा मासेमारी बोटींवर कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या, असे लेखी उत्तरात म्हटले आहे. चीनचे मासेमारी करणारे ट्रॉलर भारतीय जलक्षेत्रात मासेमारी करत असल्याचा कोणताही अहवाल नाही, असे या उत्तरात स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT