Karapur Sati Devi Temple Area  Dainik Gomantak
गोवा

MLA Premendra Shet : सती देवीच्या मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणार; आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली पाहणी

राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे सुमारे अडीच कोटी रूपये खर्चुन सुशोभीकरण करण्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism Development Corporation Beautified Sati Devi Temple Area: कारापूर तिस्क साखळी येथे सती देवीच्या मंदिर परिसराचे राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे सुमारे अडीच कोटी रूपये खर्चुन सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाच्या आराखड्यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाहणी केली.

स्थानिकांना विश्वासात घेऊनच या जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

यावेळी पर्यटन महामंडळाचे कार्यकारी अभियंता विशांत पोळे, सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, उपसरपंचा तन्वी सावंत, पंचसदस्य ज्ञानेश्वर बाले, बिंदीया सावंत, सुकांती खारकांडे, उज्वला कवळेकर, बिबी आयेशा झमीर मगोड व इतरांची उपस्थिती होती.

"या मंदिराच्या सभोवताली राखीव असलेल्या जागेत पर्यटन विकास महामंडळामार्फत कुंपणाला लागून वॉकिंग ट्रेक, एका बाजूला बालोद्यान, मंदिराजवळ व्यासपीठ व कक्ष व लहान मुलांना खेळण्यासाठी लहान मैदान असा आराखडा तयर करण्यात आला आहे" असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

"कारापूर तिस्क येथे असलेल्या देवी सतीच्या मंदिरासभोवतालचा परिसर सुशोभित करून तेथे लहान मुलांसाठी व जेष्ठांच्या विरंगुळ्यासाठी साधनसुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार पूर्वीपासून होता."

"त्याचा प्रस्ताव आमदारांकडे मांडल्यानंतर आमदारांनी लगेच त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे," असे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT