Karanataka Election Dainik Gomantak
गोवा

Karanataka Election: ऑन ड्यूटी 24 तास! गोवा, महाराष्ट्रातून येणाऱ्या अवैध मद्य, पैसा यावर कर्नाटकचे लक्ष

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यात येणाऱ्या अवैध मद्य आणि पैसा यावर याद्वारे लक्ष ठेवले जाईल.

Pramod Yadav

Karnataka Elections 2023: कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यासाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहेत. देश पातळीवरील मोठ मोठे नेते सध्या तेथे प्रचारासाठी हजेरी लावत आहेत. कांग्रेस आणि भाजप (BJP Vs Congress) यांच्यात प्रमुख लढत दिसत आहे.

दरम्यान, राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध घटना देखील घडत असतात. प्रामुख्याने अवैध मद्य आणि पैसा विविध मार्गांनी राज्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासन सध्या सतर्क झाले असून, शेजारील राज्यांच्या सीमेवर कर्नाटक लक्ष आहे.

बेळगाव (Belgagavi) जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर (Maharashtra And Goa) एकूण 24 तपासणी नाके उभारले आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यात येणाऱ्या अवैध मद्य आणि पैसा यावर याद्वारे लक्ष ठेवले जाईल.

गोवा सीमेवर चार आणि महाराष्ट्राच्या सीमेवर 20 तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकारी नितेश पाटील निवडणूक संदर्भात तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1.49 कोटी रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी अधिकाऱ्यांना प्रत्येक संशयित वाहनाची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाविरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. मे महिन्यात 224 विधानसभा जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार प्रचार सभा होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT