Siddhanna Meti Dainik Gomantak
गोवा

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

Kannada MLA demand in Goa: निवडणुकीत कुठ्ठाळीत कन्नड नेत्याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी गोवा कन्नड महासंघाने पंचायत मंत्री मॉविन यांच्याकडे केली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात प्रत्येक मतदारसंघात कन्नड मतदार असल्याचा दावा करणाऱ्या सिद्धन्ना मेटी यांनी राज्यातून कन्नड आमदारही निवडून आणण्याचा चंग बांधल्याचे दिसत आहे. कुठ्ठाळीत स्थलांतरीतांची संख्या अधिक असून, त्यांचे प्रतिनिधित्व कन्नड आमदाराने करावे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. एवढेच नव्हे येथे कन्नड उमेदवार देण्याची मागणीही गोवा कन्नड महासंघाने मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे केलीय.

झुवारीनगर येथे स्थलांतरीतांची संख्या अधिक आहे. यात कन्नड नागरीक बहुसंख्य आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कुठ्ठाळीत कन्नड नेत्याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी गोवा कन्नड महासंघाने पंचायत मंत्री मॉविन यांच्याकडे केली आहे.

परप्रांतीय उमेदवाराचा मंत्री गुदिन्हो विचार करतील, असा विश्वासही मेटी यांनी व्यक्त केला आहे. कन्नड नागरिकांचे योगदान आणि त्यांची संख्या याचा विचार करण्यात यावा आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमच्या समुदायातील उमेदवार देण्यात यावा, असे मत त्यांनी मांडले आहे.

मेटी यांनी गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात कन्नड मतदार असल्याचा दावा केला आहे. “दोन हजार ते २५ हजार पर्यंत मतदार प्रत्येक मतदार संघात असल्याचे मेटी म्हणाले. त्यामुळे सर्वांनी आपण भाऊ – बहीण असल्याचा विचार करुन एकत्र काम करायला हवं आणि प्रेमाने एकत्र राहायला हवं”, असे मेटी म्हणाले.

“आम्ही प्रत्येक मतदारसंघात मतदान केले आहे, मुख्यमंत्री विजयातही आमचे योगदान आहे”, असे मेटी म्हणाले.

“कोणीतरी सरपंच झाले तर त्याचे अभिनंदन करायला हवं. आम्ही तुमच्यासाठी मतदान केलं आहे. कोणीतरी सरपंच झाले तर आम्हाला घाटी – घाटी किंवा लमाणी म्हणून हिणवलं जातं, असं बोलण्याची गरज नाही. येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमचे प्रतिनिधीत्व करणारा उमेदवार विजयी होईल. आमचा आमदारही विजयी होईल”, असे मेटी म्हणाले.

दरम्यान, मेटी यांनी यावेळी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्यावर निशाणा साधत त्यांच नाव देखील घेण्याची लाज वाटत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, परब यांनी वारंवार घाटी - घाटी म्हणून आम्हाला हिणवू नये, शेजारी राज्य भावासारखी आहेत. सर्वांनी प्रेमाने राहायला हवं. लोक पोट भरण्यासाठी येथे आलेत चोरी करण्यासाठी नाही, असे मेटी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT