मराठी भाषा गौरव दिन Dainik Gomantak
गोवा

मराठी भाषेचा नित्य वापर आवश्‍यक: कालिदास मराठे

मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

फोंडा: भाषा टिकवायची असेल तर नित्य जीवनात तिचा वापर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कालिदास मराठे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विद्यार्थी गौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

मराठे पुढे म्हणाले,की भाषा टिकवण्याची सुरुवात आपण आपल्या स्वाक्षरीपासून सुरू करू शकतो. घरातील मंडळी, नातेवाईक तसेच शेजाऱ्यांनाही त्याबाबत आग्रह धरू शकतो.

गोवा मराठी अकादमी, फोंडा शाखा आयोजित हा गुणगौरव कार्यक्रम, गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या आगियार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सौजन्याने, फर्मागुडी येथील त्यांच्या सभागृहात झाला. व्यासपीठावर आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, गोवा मराठी अकादमी फोंडा प्रभाग प्रमुख नितीन कोलवेकर, विद्या वृध्दी हायस्कूलचे अध्यक्ष उदय डांगी, प्रेमानंद नाईक व निलेश नाईक उपस्थित होते.कुसुमाग्रज यांच्या काही निवडक कवितांचे वाचन आर्या देसाई, वेदा कासार, रसिका जोशी, ॲड साधना फडके, निलेश नाईक, संपूर्णा भगत, नितीन कोलवेकर यांनी केले.

नितीन कोलवेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या वतीने कु. आर्या हिने विचार मांडले. सूत्रसंचालन श्रृती हजारे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: धोनी स्टाईल गेम प्लॅन अन् ईशान किशनचा मास्टरस्ट्रोक! बापूनं जोस बटलरला केलं क्लीन बोल्ड; 'त्या' सल्ल्यानं खेळ खल्लास

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027चा विश्वचषक खेळणारच! निवृत्तीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

Tarun Tejpal Case: तेजपाल लैंगिक छळ प्रकरण: पीडितेच्या विधानांतील विसंगतींवर बचाव पक्षाने ठेवले बोट, सुनावणी अंतिम टप्प्यात

Shadashtak Yoga: सूर्य आणि राहुचा भयंकर षडाष्टक योग! 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींसाठी धोक्याची घंटा; नशिबाची परीक्षा घेणार काळ

SCROLL FOR NEXT