Goa Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: 'कला अकादमी'चा होणार कायपालट! कृती दलाच्या सूचनांची दखल; तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश

Kala Academy Renovation: मुख्य अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या आदेशानुसार, तज्ज्ञांनी सुचवलेली कामे मूळ निविदेचा भाग होती का, याची सखोल तपासणी होणार आहे.

Sameer Panditrao

पणजी : गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कला अकादमीच्या नूतनीकरण व सुधारणा प्रकल्पास अखेर गती मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता-दोन यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

कला अकादमीच्या नूतनीकरणासंदर्भात तज्ज्ञांच्या कृती दल समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची शिफारस समितीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सादर केली होती. मुख्यमंत्र्यांनी याला संमती देऊन अंमलबजावणीसाठी या शिफारसी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविल्या आहेत.

कला अकादमीच्या नूतनीकरण प्रकल्पासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार कामास तातडीने सुरुवात होणार आहे. मूळ निविदेतील कामांची पडताळणी, दर्जा परीक्षण व आवश्यक असल्यास नवीन कामासाठी स्वतंत्र निविदा हे टप्पे लवकरच पूर्ण होणार असून, गोव्यातील या सांस्कृतिक केंद्राचा लवकरच कायापालट होताना दिसणार आहे.

मूळ निविदेतील कामांची होणार चौकशी

मुख्य अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या आदेशानुसार, तज्ज्ञांनी सुचवलेली कामे मूळ निविदेचा भाग होती का, याची सखोल तपासणी होणार आहे. याशिवाय, ही कामे जर आधीच मंजूर असताना निकृष्ट दर्जाच्या साहित्याने किंवा अर्धवट स्वरूपात पार पाडली गेली असतील, तर कंत्राटदाराकडून त्या तातडीने दुरुस्त अथवा पुनर्निर्मित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवीन कामांसाठी स्वतंत्र निविदा

जर काही कामे ही तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार नव्याने सुचवलेली असतील, तर त्यासाठी स्वतंत्र निविदा तयार करून काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी समितीने नेमलेल्या सल्लागारांकडून तपशीलवार माहिती व तांत्रिक माहिती प्राप्त करून निविदा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT