Goa Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: एक नया पैसा न देता 'कला अकादमी'ची दुरुस्ती करणार, कंत्राटदार 'ब्लॅकलिस्ट'मध्ये; मुख्‍यमंत्री ॲक्शन मोडवर

Kala Academy Problems: कला अकादमीचे निकृष्‍ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी वक्‍तव्‍य केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: कला अकादमी नूतनीकरणात राहिलेल्‍या त्रुटी दूर करण्‍यासाठी योग्य ती पावले उचलण्‍यात आली आहेत. ज्‍या त्रुटी आहेत, त्‍या संबंधित ठेकेदाराकडूनच दूर करण्‍यात येतील. काम पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याला ‘ब्‍लॅकलिस्‍ट’मध्‍ये टाकण्‍यात येईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पणजी येथे पत्रकारांनी त्‍यांना कला अकादमीच्या नूतनीकरणाविषयी विचारले असता ते म्‍हणाले, टास्‍क फोर्सच्‍या शिफारशींप्रमाणे चुकीच्‍या पद्धतीने झालेली कामे दुरुस्‍त करण्यात येतील. ज्‍या काही नव्‍या बाबी कराव्‍या लागतील, त्‍यासाठी टेंडर काढण्‍यात येईल. झालेल्‍या चुका निस्‍तरण्‍याची कामे ‘त्‍याच’ कंत्राटदाराकडून एक नवा पैसाही न देता करून घेण्‍यात येतील, असेही मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

हे महत्त्वाचे प्रश्‍न अनुत्तरित

1 कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामांची चौकशी होणार का?

2 कंत्राटदारावर काळ्या यादी व्यतिरिक्त काहीच कारवाई नाही?

3 कामावर देखरेख ठेवणारे सरकारी अभियंते काय करत होते?

4 केवळ बिल अदा न करून कंत्राटदाराला मोकळीक?

5 कंत्राटदाराला जबाबदारीमुक्त केल्याने पुढील देखभाल दुरुस्ती कोण करेल?

6 आताच्या कामांची हमी कोण

कला अकादमीचे निकृष्‍ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी वक्‍तव्‍य केले आहे, त्‍याचे गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी स्‍वागत केले आहे. मात्र, निविदा न काढता अशा ठेकेदाराला या कामासाठी कुणी नेमले आणि ही नेमणूक करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर सरकार काय कारवाई करेल, याचे स्‍पष्‍टीकरण मुख्‍यमंत्र्यांनी द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT