Goa Kadamba Corporation Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांसाठी साई बाबांचे दर्शन झाले सोपे, कदंबची बससेवा सुरू

कदंबची गोवा - शिर्डी बससेवा 13 पासून सुरू ही बस मडगाव-पणजी-पुणे ते शिर्डी अशी धावणार असून कदंबच्या संकेतस्थळावर आरक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड महामारीच्या (Covid-19) काळात बंद असलेली कदंबची (Kadamba Bus Service) गोवा ते शिर्डी (Goa to Shirdi bus) बससेवा 13 आक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही बस मडगाव-पणजी-पुणे ते शिर्डी (Panajim-Pune- Shirdi) अशी धावणार आहे. कदंबच्या संकेतस्थळावर आरक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रवासी कदंबच्या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधू शकतात, असे कदंबचे मुख्य व्यवस्थापक संजय घाटे यांनी कळविले आहे.

दरम्यान कर्नाटक एसटी महामंडळाने आपल्या अनेक बसेस गोव्यात पाठवल्यानंतर कदंब महामंडळानेही आपल्‍या काही बसेस कर्नाटकात पाठवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळ कदंबने बसेस सुरू केल्या नव्हत्या. तसेच महाराष्ट्रातून गोव्यात ये-जा करणाऱ्या बसेसही बंदच होत्या. मात्र आता गोव्यातील आणि महाराष्ट्रातीलही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असून राज्याबाहेरही वाहतूक सुरू झाली आहे.

कोविडमुळे बंद असलेली गोवा कदंब महामंडळाची आंतरराज्य मार्गावरील बस सेवा आता टप्याटप्याने सुरू करण्यात येत आहे.त्यातच आता शिर्डीसाठी बससेवा 13 तारखेपासून सुरू होत आहे. दरम्यान एक सप्टेंबर पासून गोव्यातील कदंबची बससेवा मुंबई, पुणे आणि बेंगळुरू या तीन महामार्गांवरील कदंब बसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र या बसमध्ये लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जातोय, अशी माहिती कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली.

या बस सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावरून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. आणि आज प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादामुळे गोव्यातील कंदबची बससेवा शिर्डी साठीही सुरू झाली आहे. आता गोवेकरांना साई बाबांचे दर्शन घेणे अधिकच सोपे झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT