Kadamba Bus Goa X
गोवा

Kadamba Bus: साखळी ते पणजी धावणारी 'कदंब' गायब? कारापूर-सर्वणमधील विद्यार्थी अडकले, बेभरवशाच्या सेवेमुळे अनेकांना फटका

Karapur Sarvona Kadamba Bus: डिचोली तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी बससेवा कोलमडली असून, ''कदंब''ची प्रवासी बससेवा तर बेभरवशाची बनली आहे.

Sameer Panditrao

Karapur Sarvona Kadamba Bus

डिचोली: डिचोली तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी बससेवा कोलमडली असून, ''कदंब''ची प्रवासी बससेवा तर बेभरवशाची बनली आहे. कारापूर-सर्वणमार्गे साखळी ते पणजी मार्गावर वाहतूक करणारी ''कदंब''ची प्रवासी बसगाडी गेल्या दोन दिवसांपासून गायब झाली आहे.

काल (बुधवारी) आणि आज (गुरुवारी) ही बसगाडी नियोजित मार्गावर धावलीच नाही. त्यामुळे नियमित प्रवाशांची प्रचंड गैरसोय होताना विद्यार्थीही अडकून पडले. ही प्रवासी बसगाडी अचानक गायब होण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

साखळीहून सकाळी ७.३० वा. सुटणारी कदंबची बसगाडी कारापूर-सर्वणमार्गे डिचोलीहून पणजी मार्गावर वाहतूक करते. ''कदंब''ची ही प्रवासी बसगाडी कारापूर आणि सर्वण या ग्रामीण भागातील प्रवाशांना विशेष करुन कामगार आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ही बसगाडी गायब आहे.

कारापूर-सर्वणहून डिचोली आदी शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होताना ते दोन दिवस अडकून पडले. विद्यार्थ्यांना पायपीट करुन शाळा गाठावी लागली. शाळेत वेळेवर पोचणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. कदंब वाहतूक महामंडळाने गैरसोय लक्षात घेवून कारापूर-सर्वणमार्गे धावणारी प्रवासी बसगाडी नियमित करावी. अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT