Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

KTC New Buses For G20 Summit: गोव्यातील G20 बैठकीच्या पार्श्वभुमीवर 'कदंबा' खरेदी करणार मोठ्या आकाराच्या नवीन 100 बसेस

दक्षिण गोव्यातील 32 नवीन मार्गांवर धावणार

Akshay Nirmale

KTC New Buses For G20 Summit: गोव्यात होणार्‍या G20 शिखर बैठकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सार्वजनिक वाहतूक नेटवर्क सुधारण्यासाठी कदंबा परिवहन महामंडळ (KTC) नवीन बसेस खरेदी करणार आहे. तसेच नवीन मार्गांवर या बस सुरू केल्या जाणार आहेत.

KTC नवीन 100 मोठ्या आकाराच्या बसेस खरेदी करणार आहे. या बसेस कनेक्टिव्हिटीच्या प्राधान्याच्या आधारावर नवीन मार्गांवर सुरू केल्या जातील. हे मार्ग देखील निश्चित्त केले गेले आहेत, असे कळते. यापैकी 32 नवीन मार्ग दक्षिण गोव्यात असतील.

जून 2023 पर्यंत दक्षिण गोव्यातील या 32 नवीन मार्गांवर बसेस सुरू होतील. दरम्यान, कार्यकाळ संपलेल्या 50 बसेस स्क्रॅप केल्या जाणार आहेत.

नवीन मार्गांवर बसेस सुरू करण्याच्या मागण्या आमदारांनी केल्या आहेत.मात्र, ज्या मार्गांवर सध्या कनेक्टिव्हिटी नाही, अशा मार्गांना प्राधान्य दिले जाणार आहे, असल्याचे समजते.

दरम्यान, नुकतेच कदंबाने तळावली ते नावेली बस सुरू केली आहे. खासगी बसचालकाने येथील बस बंद केली होती. त्यामुळे ही कदंबाने या मार्गावर बससेवा सुरू केली. लोकांचा प्रतिसाद पाहून या मार्गावर दुसरी बस सुरू करायची की नाही, ते ठरवले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT