Kadamba Transport Corporation Dainik Gomantak
गोवा

Kadamba Corporation: दिव्यांगजन आयोगाच्या प्रयत्नांनी 'कदंब' वरील काही दुकाने दिव्यांगांसाठी आरक्षित

Kadamba Corporation: अखेर पावसकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.

दैनिक गोमन्तक

Kadamba Corporation: राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर कदंब परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील काही कदंब बसस्थानकांवरील दुकाने दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 37 (क) नुसार जमिनीचा वापर गृहनिर्माण, व्यवसाय, उद्योग, मनोरंजन केंद्र आणि उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी होत असेल असेल तर जमिनीच्या वाटपामध्ये सवलतीच्या दराने दिव्यांगांसाठी 5 टक्के आरक्षण अनिवार्य आहे, अशी माहिती राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.

काही दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रातील कदंब बसस्थानकावरील दुकाने चालविण्यासाठी दिव्यांगांनाही संधी मिळावी, या आशयाची तक्रार आयोगाकडे दाखल केली होती. दिव्यांगांच्या तक्रारीची दखल घेत राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर आणि कदंबचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. अखेर पावसकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.

मोहोरबंद निविदा पाठविण्याचे आवाहन

पेडणे, माशेल, होंडा, अस्नोडा, पणजी, कुंकळ्ळी, काणकोण आणि शिरोडा येथील बसस्थानकांवरील काही दुकाने दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवली आहेत. ही दुकाने भाडे तत्त्वावर प्रदान करण्यासाठी 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मोहोरबंद निविदा पाठविण्याचे आवाहन कदंब महामंडळातर्फे करण्यात आले आहे. यासाठी दिव्यांग असलेली व्यक्ती पात्र आहे.

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत

दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर आणि कदंबचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांचे आभार मानले. या निर्णयाने अनेक दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे.

दिव्यांगांनी पुढाकार घेऊन याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन पावसकर यांनी केले. यासंबंधित अधिक माहिती www.ktclgoa.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून निविदा अर्ज वर नमूद करण्यात आलेल्या बसस्थानकावरील स्थानक प्रभारी यांच्याकडे उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT