Kadamba' free service to passengers' in goa Dainik Gomantak
गोवा

‘...तर ‘कदंब’ प्रवाशांना मोफत सेवा’

महामंडळाला सरकारकडून दरवर्षी जे अनुदान दिले जाते.त्यातून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत दिली जाते.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सरकारने 100 टक्के अनुदान दिल्यास कदंब महामंडळ प्रवाशांना मोफत सेवा देऊ शकते, असे नावेलीचे आमदार व कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी सांगितले. महामंडळाला सरकारकडून दरवर्षी जे अनुदान दिले जाते.त्यातून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत दिली जाते.

('Kadamba' free service to passengers' in goa)

शिवाय पास पद्धतीचाही प्रवाशांना लाभ होतो. एका इलेक्ट्रिक बसची किंमत 1.40 कोटी रुपये आहे. शिवाय एका बसच्या चार बॅटऱ्या चार्ज कराव्या लागतात. एका बॅटरीला 30 ते 40 लाख रुपये खर्च येतो. या बसेस डिसेंबरपर्यंत महामंडळाच्या ताफ्यात सामील होतील, अशी आशा तुयेकर यांनी व्यक्त केली.

सध्या महामंडळातर्फे 50 इलेक्ट्रिक बसेस कार्यरत आहेत. या बसेस चालविण्यासाठी हैदराबाद येथील इवेय ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी महामंडळाने करार केला असून कंपनीला दर बस मागे दर किमी अंतराला 75.87 रुपये दिले जातात. त्यामुळे महामंडळाला प्रत्येक बसमागे दर किमी मागे 51 रुपये तोटा सोसावा लागतो. तरीही महामंडळातर्फे गोव्यातील ग्रामीण भागातही बससेवा सुरू करण्याचा इरादा आहे. त्यामुळे आणखी 100 इलेक्ट्रिक बसेस महामंडळ घेणार असल्याचेही उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT