Kadamba Bus  Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus: स्मार्ट सिटी पणजीत आता कदंबची 'कॅशलेस सेवा'; नियमित प्रवाशांना ‘आरएफआयडी’ स्मार्ट कार्ड

Panjim Smart City: अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आलेल्या बसगाड्यांमध्‍ये महिन्यानंतर कंडक्टर आपली सेवा देणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: स्मार्ट सिटीअंतर्गत पणजी शहरात चालविल्या जाणाऱ्या बसगाड्या आता लवकरच कॅशलेस सेवा पुरविणार असल्याची माहिती कदंब महामंडळातर्फे देण्यात आली. त्यासाठी नियमित प्रवाशांना लवकरच ''आरएफआयडी'' स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून एकाच वेळी याचे पैसे भरावे लागणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पणजी शहरात वाहतुकीसाठी स्मार्ट सिटीअंतर्गत विजेवरील बसगाड्या कदंब महामंडळाला देण्यात आल्या आहेत. कदंब महामंडळ बसगाड्या चालवीत आहे व या बसगाड्यांचे व्यवस्थापन इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेड करत आहे. स्मार्ट सिटीतर्फे एकूण ४८ बसगाड्या देण्यात आल्या असून त्यातील केवळ ४० बसगाड्या मार्गावर चालू आहेत. ८ बसगाड्या आपत्कालीन वेळी वापरण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आलेल्या बसगाड्यांमध्‍ये महिन्यानंतर कंडक्टर आपली सेवा देणार नाही. कार्डचा वापर करून नियमित प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. कार्ड तयार करण्यासाठी पणजी बस स्थानक येथे एक विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहे. १५० रुपयांमध्ये हे कार्ड करता येणार आहे. कधीतरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ड्रायव्हर तिकीट देण्यासाठी एक फील्ड वर्कर बसमध्ये ठेवण्यात येईल. रोज प्रवास करणाऱ्यांसाठी या कार्डचा फायदा होणार आहे.

४० मार्गांवर बसगाड्या

स्मार्ट सिटीतर्फे सुरू करण्यात आलेल्या बसगाड्या एकूण ४० मार्गांवर धावत आहेत. पणजी बसस्थानक, फेरी, कला अकादमी, मिरामार, दोनापावला, ताळगाव, गोवा वैद्यकीय महाविद्यालय या महत्त्वाच्या मार्गावर देखील स्मार्ट सिटीच्या बसगाड्या सेवा देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT