Kadamba Bus Passenger Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus : ‘पास’असून त्रास; ‘कदंब’प्रवाशांची व्यथा

Kadamba Bus : नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निर्धारित ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हाच योग्य पर्याय आहे, त्याचा वापर करा, असा आग्रह कदंब महामंडळाकडून केला जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, येथील कदंब बस स्थानकावर नियमित प्रवास करणाऱ्या पास धारक प्रवाशांवर नेहमीच बससाठी तासंतास रांगेत उभे राहण्याची नामुष्की ओढवते.

आजही हा प्रकार घडल्याने मडगावला जाणाऱ्या पासधारक प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

सायंकाळी ६ वाजल्यापासून ७.४५ पर्यंत शेकडो पासधारक प्रवासी ताटकळत उभे होते. अखेर या प्रवाशांनी रात्री ८.१५ च्या सुमारास बस उपलब्ध झाली, असे सूत्रांनी सांगितले.

नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निर्धारित ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हाच योग्य पर्याय आहे, त्याचा वापर करा, असा आग्रह कदंब महामंडळाकडून केला जातो.

मात्र, बसच जर वेळेवर मिळणार नसतील, तर या घोषणेला किंवा आवाहनाला काही अर्थ उरतो का, असा सवाल कदंब बसस्थानकावर तिकीटाच्या रांगेत उभ्या प्रवाशांनी केला.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रांगेत उभे असलेल्या प्रवाशांचे फोटो प्रसारित करून सामान्य जनतेला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाची सरकार दखल घेणार का, असा सवाल केला आहे.

दरम्यान, यासंदर्भात कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेंकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

वेळेत घरी तरी पोहचू द्याल का?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार लोकांना वेळेत घरीही पोहचू देत नाही का, असा सवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. सामान्य गोमंतकीयांच्या कराच्या पैशांवर आलिशान कार प्रवासाची चैन उपभोगणाऱ्या वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत बोलावे,असेही पाटकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT