Kadamba Bus Stand Dainik Gomantak
गोवा

फोंडा कदंब बसस्थानक कात टाकणार

आठवड्यात काम सुरू : 80 लाखांचा खर्च अपेक्षित; तीस वर्षांची प्रतीक्षा संपली

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंड्यातील कदंब बसस्थानक तब्बल तीस वर्षांनी कात टाकणार आहे. सर्वच बाबतीत धोकादायक ठरलेले आणि प्रवाशांना किमान सोयीही नसलेल्या या आंतरराज्य बसस्थानकाची दैन्यावस्था झाली होती, मात्र या बसस्थानकाची वास्तू धोकादायक ठरल्याने आता त्याचे नूतनीकरण केल्याशिवाय पर्याय नसल्याचा साक्षात्कार झाल्याने नूतनीकरणाच्या कामाला आठवड्याभरात सुरवात होणार आहे. यासाठी 80 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

फोंडा तालुक्यातील हे महत्त्वाचे बसस्थानक म्हणजे फोंडा, मडकई, प्रियोळ आणि शिरोडा या चार मतदारसंघांचा महत्त्वाचा दुवा असून तीस वर्षे कशी काय बुवा या बसस्थानक नूतनीकरणासाठी लागली, असा सवाल अंत्रुजवासीयांकडून होत आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने तालुक्यातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी कार्यवाही व्हावी, असेही मत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

फोंड्यातील या कदंब बसस्थानकाच्या कामाला येत्या आठवड्याभरात सुरवात होणार असल्याची माहिती कदंब महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कामात छताचे पूर्ण काम करण्याबरोबरच धोकादायक ठरलेल्या काँक्रिटचे खांब तसेच छताचे ‘बीम'' दुरुस्तीसह इतर काम तसेच रंगरंगोटी आणि आवश्‍यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हे काम सुरू करण्यासाठी बुधवारी कंत्राटदार पर्यवेक्षकाला बोलावून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आवश्‍यक सूचना केल्या आहेत.

सुदिन ढवळीकरांचा पाठपुरावा!

फोंड्यातील हे कदंब बसस्थानक मूळात येथील मैदानावर बांधण्यात आले आहे. वर्षभरात या बसस्थानकाचे काम पूर्ण झाले तरी उद्‍घाटनानंतर प्रवाशांची गैरसोय होत असल्याने हे बसस्थानक बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा सहा महिन्यात हे बसस्थानक खुले झाले, त्यानंतरही महिन्याभराच्या काळानंतर ते बंद पडले. मात्र वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्याकाळी बांदोड्याचे तत्कालीन सरपंच, पंचसदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन हे बसस्थानक पूर्णपणे खुले करण्यासाठी पाठपुरावा केला, आणि ढवळीकर यांच्यामुळे त्यानंतर सुरू झालेल्या या बसस्थानकाचा वापर आजही सुरू आहे.

फोंड्याचे सध्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत हे बसस्थानक बांधले होते. जुन्या बसस्थानकावरील वाहनांची गर्दी, प्रवाशांची होणारी गैरसोय आणि कर्नाटक, महाराष्ट्रातील बसगाड्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन रवी नाईक यांनी या बसस्थानक कामाला प्राधान्य दिले. 18 सप्टेंबर 1991 मध्ये पायाभरणी आणि एका वर्षाने 18 सप्टेंबर 1992 मध्ये हे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या बसस्थानकाकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाले, त्यामुळेच दोनवेळा छताच्या काँक्रिटचे तुकडे कोसळून एकजण जखमी झाला होता.

तात्पुरती शेड पडणार अपुरी

बसस्थानकाची वास्तू बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे, प्रवासी सध्या झाडाच्या खाली तसेच दुकानांच्या आडोशाला थांबतात म्हणून सध्या तात्पुरती शेड उभारण्यात येत आहे, मात्र ही शेड एकदम छोटी असल्याने त्यात किती प्रवाशांना बसायला मिळणार आणि पावसापासून कसा काय बचाव होणार देवच जाणे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT