Kadamba Bus Stops Dainik Gomantak
गोवा

पणजीतील कदंबा बसस्थानक बकाल अवस्थेत

पणजी (Panajim) कदंबा बसस्थानकाच्या (Kadamba Bus Stops) दुरवस्थेची आज पुन्हा एकदा विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी (Panajim) कदंबा बसस्थानकाच्या (Kadamba Bus Stops) दुरवस्थेची आज पुन्हा एकदा विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. गोव्यासारख्या (Goa) जागतिक पर्यटन (Tourism) राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहराचे बस स्थानक हे एकदम बकाल अवस्थेत आहे आणि त्यामुळे गोवाकॅन यास्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना या बस स्थानकाची पाहणी करण्यास लावले होते. (Kadamba bus stand in Panaji is in bad condition)

गोवाकॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन यांनी पणजी कदंब बसस्थानकाच्या दुरवस्थेला कदंब महामंडळाच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. ज्येष्ठ नागरिकांचा तसेच दिव्यांग व्यक्तींना येथे ये-जा करण्यासाठी योग्य जागा नाही. त्याचबरोबर एकही फलक योग्य पद्धतीने लावण्यात आलेला नाही. मिळेल तिथे पार्किंग केली जाते. त्याचबरोबर कचरा समस्या आणि एकूणच असलेली दुरावस्था याबद्दल मार्टिन यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.

तर कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी कदंब बसस्थानकावर पणजी बस स्थानक त्याचबरोबर पणजी बस डेपो असे दोन विभाग असल्यामुळे येथे बसेसची गर्दी होते. त्याचबरोबर खासगी, खाजगी वाहने आणि कदंबच्या बसेसही येथे पार्किंग करून ठेवल्या जातात त्यामुळे वाहनांची संख्या वाढल्यामुळे कदंब बस स्थानकाची दुरावस्था झाल्याचे सांगितले. अग्निशामक दल, वाहतूक पोलीस, वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते , जिल्हाधिकारी, पणजी महापालिका अशा विविध विभागांच्या व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आज एकूणच बस स्थानकाची पाहणी केली.

या पाहणीचा अहवाल लवकरच वाहतूक पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील मॉनिटरींग समितीला सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यानंतर तो अहवाल राज्य सरकारला आणि उत्तर गोवा खासदार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना सुपूर्त करण्यात येणार असल्याचे रॉलांड मार्टिन यांनी सांगितले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT