Kadamba Bus  Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Services: कामुर्लीला रात्रीची ‘कदंब’ बस बेभरवशाची ; प्रवाशांची गैरसोय

बस नसल्याने लोकांची पायलट; रिक्षेवर भिस्त

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus Services: येथील बसस्थानकावरुन रात्री उशिरा कामुर्ली गावाला जाणारी शेवटची कदंबा बस आठवड्यातून एक-दोन वेळा नसते. परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

मंगळवारी (ता.१८) सायंकाळी ७.४५ वाजताची बस नसल्याने लोकांना पायलट किंवा शेअरींगमध्ये रिक्षाचा आसरा घ्यावा लागला. हा प्रकार मागील काही दिवसांपासून नित्याचाच बनलाय, अशी कैफियत प्रवाशी वर्गाने मांडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ७.४५ची बस नसल्याने लोकांची भरपावसात पंचाईत झाली. गेल्या आठवड्यात सुद्धा लोकांना हा मनस्ताप सहन करावा लागलेला.

कदंबा बसस्थानकावरुन रात्री उशिरा कामुर्ली गावाला जाणारी बसची शाश्वती नसते. आणि याविषयी संबंधितांना विचारल्यास त्यांच्याकडे समाधानकारक उत्तर नसते, अशी तक्रार या बसमधून प्रवास करणार्‍यांनी केली आहे.

कामुर्लीचे रहिवासी विनय प्रभू म्हणाले की, कामुर्ली गावाला जाण्यासाठी रात्री उशिरा ७.४५ची कदंबाची शेवटची बस आहे. या बसमध्ये जवळपास ३५ ते ४० प्रवासी हमखास असतात. उन्हाळ्यात बस नसल्यास पायलट करून जाता येते. परंतु, पावसाळ्यात छत्री घेऊन पायलटच्या दुचाकीवर बसणे अवघड होऊन बसते.

बाजारपेठेत कामुर्ली गावातील स्थानिक महिला व्यापारासाठी येतात. त्यांची कमाई जास्त नसते, परंतु बस नसल्यास मग त्यांना शेअरिंगमध्ये रिक्षा करुन आपले घर गाठावे लागते.

अशाप्रकारे आपली दिवसभराची कमाई त्यांना या रिक्षाच्या भाड्यात घालावी लागते. तसेच पायलट व रिक्षाचे भाडे हे दरवेळी परवडणारे नसते. आज मंगळवारी रात्री कदंबाची बस नसल्याने लोकांची गैरसोय झाली, असेही प्रभू म्हणाले.

बस नादुरूस्त; कधी चालक नाहीची सबब !

बस नसल्यास संबंधित यंत्रणेकडून आज डेपोमधून बस पाठविली नाही, किंवा बस नादुरुस्त झाली आहे. तर कधीकधी चालक किंवा वाहक नाही, अशी उत्तरे दिली जातात,असा दावा प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी कामुर्लीमधील प्रवासीवर्गाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT