Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus : ‘कदंब’ बससेवा कोलमडली; महामंडळाने लक्ष द्यावे

Kadamba Bus : मुळगावातून शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही बस सोयीस्कर आहे. विद्यार्थ्यांची सोय व्हावी, म्हणून मुळगावमधील अंतर्गत मार्गाने ही बस सुरू करण्यात आली आहे. मात्र ही बस आता बेभरवशाची झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली तालुक्यातील ग्रामीण भागात कदंबाची बससेवा कोलमडली असून विद्यार्थी, शिक्षकांना वेळेत शाळेत पोचणे कठीण होत आहे. 'कदंब'ची प्रवासी बससेवा नियमित करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे.

मुळगावमार्गे आमठाणे ते पणजी मार्गावर वाहतूक करणाऱ्या ''कदंब''च्या प्रवासी बसगाडीचा अनियमितपणा सध्या वाढला आहे, अशी मुळगावसह अन्य ग्रामीण भागातील प्रवाशांची तक्रार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून सदर बससेवा अनियमित आहे. बसच्या अनियमितपणामुळे नोकरीधंद्यानिमित्त शहराच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसह विविध भागात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थीवर्गाचेही हाल होत आहेत.

आमठाणेहून सुटणारी कदंबची बस मेणकूरे-अडवलपालहून मुळगावमार्गे डिचोलीहून पणजी मार्गावर वाहतूक करणारी ''कदंब''ची प्रवासी बससेवा ग्रामीण भागातील प्रवाशांना विशेष करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर असली, तरी या बसच्या अनियमितपणात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

मुळगाव येथील विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी ही बस अस्नोड्याहून मुळगावमधील अंतर्गत मार्गाने वाहतूक करीत आहे. डिचोली शहरात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी याच बसवर अवलंबून असतात. मात्र बस आली नाही, तर विद्यार्थी अडकून पडतात. मग विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. विद्यार्थीही वेळेवर शाळेत पोचत नाहीत, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची तक्रार आहे.

मुळगाव-आमठाणेप्रमाणेच शिवोली सारख्या ठिकाणीसुद्धा अनेक वेळा कदंब बस गायब होते, त्यामुळे सकाळी किंवा दुपारी विद्यर्थी - शिक्षकांना वेळेवर ये-जा करता येत नाही. वेळापत्रकाप्रमाणे सोडल्या जात नाहीत. त्यामुळे कदंबावर विश्‍वास कसा ठेवावा, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

महामंडळाने लक्ष द्यावे!

मुळगावातून शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही बस सोयीस्कर आहे. विद्यार्थ्यांची सोय व्हावी, म्हणून मुळगावमधील अंतर्गत मार्गाने ही बस सुरू करण्यात आली आहे. मात्र ही बस आता बेभरवशाची झाली आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून दहा ते बारावेळा ही बस आलेली नाही. बस नसली की, विद्यार्थ्यांना धावपळ करून मुख्य रस्त्यापर्यंत पायपीट करावी लागते. दुपारीही वेळेत घर गाठता येत नाही, असे पालक तथा मुळगावचे माजी सरपंच संतोष सराफ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT