Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: कदंबच्या वार्षिक पासवर 30 टक्के सूट! 1 नोव्हेंबरपासून मासिक पासही स्वस्त

Kadamba Bus Pass Discount: कदंब परिवहन महामंडळाच्या मासिक पाससाठी यापूर्वी १० टक्के सवलत दिली जात होती. ती १ नोव्हेंबरपासून २० टक्के करण्यात येईल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कदंब परिवहन महामंडळाच्या मासिक पाससाठी यापूर्वी १० टक्के सवलत दिली जात होती. ती १ नोव्हेंबरपासून २० टक्के करण्यात येईल. त्याचबरोबर वार्षिक पास घेणाऱ्यांना ३० टक्के सवलत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

कदंब परिवहन महामंडळाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील बसस्थानक परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते महामंडळाच्या पहिल्या बसचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर, व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की ‘कदंब’च्या वाहकांना कंत्राटी पद्धतीवर घेतले होते. या वर्षापासून प्रत्येकवर्षी एक हजार रुपये याप्रमाणे वेतनवाढ दिली जाईल. याशिवाय त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी सुविधाही दिली जाईल. ज्यांचा सेवेचा कालावधी संपला आहे, त्यांना सेवेत नियमित केले जाईल, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मंजूर केल्या जातील असे आश्वासन देत नोव्हेंबर १२ रोजी होणारा संप कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (अधिक वृत्त/३)

खासगी बससेवेशी स्पर्धा नाही : मुख्यमंत्री

कदंब महामंडळ लोकसेवा करते. खासगी बससेवेशी स्पर्धा करत नाही.

खासगी बसचालकांच्या फायद्यासाठी ‘माझी बस योजना’ सुरू. त्यातून बसमालकांना अतिरिक्त २० हजार रुपये लाभ. या सेवेत जास्तीत जास्त खासगी बसचालकांनी सहभागी व्हावे.

ऑनलाईन तिकीट, स्मार्ट कार्ड, मोबाईल ॲप अशा सेवा यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य गरजेचे.

कर्मचाऱ्यांना दरवर्षी वेतनवाढ : कदंब परिवहन महामंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ दिली जाईल. त्याचबरोबर ज्यांच्या कंत्राटाचा कालावधी संपला आहे त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जाईल, असे सांगत मुख्यमंत्री सावंत यांनी कर्मचाऱ्यांना दसऱ्याची भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Flight Bomb Threat: गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी; प्रवाशांना उतरवले, उड्डाणाला 5 तास विलंब

Drug Case: कमी वेळेत श्रीमंत होण्याचा मोह नडला! इंजिनिअरकडून 9.70 लाखांचे ड्रग्स जप्त

Goa Politics: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-मगो एकत्रच लढणार; युतीचा अंतिम निर्णय दिल्ली दरबारी!

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये निषाद कुमारचा 'गोल्ड' धमाका; उंच उडीत रेकॉर्ड रचत पटकावले दुसरे सुवर्णपदक!

Mangal Gochar 2026: बॉस पण खूश अन् पाकीट पण फुल! 12 नोव्हेंबरनंतर 'या' 4 राशींचे पालटणार नशीब; मंगळ गोचरमुळे आयुष्याला मिळणार नवा टर्न

SCROLL FOR NEXT