Vasco da Gama Railway Station Dainik Gomantak
गोवा

Vaso Railway: रेल्वेकडून पाच कबरींची मोडतोड? वास्कोत तणाव

मायमोळे कब्रस्तानात सुरू असलेल्या कामाची पूर्वकल्पना देण्यात आली नाही. अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली.

Pramod Yadav

Vaso Railway: मायमोळे कब्रस्तानातील सुमारे पाच कबरींचे नुकसान केल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. यामुळे मंगळवारी वास्कोमध्ये काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

मायमोळे कब्रस्तानात सुरू असलेल्या कामाची पूर्वकल्पना देण्यात आली नाही. अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेकडून मायमोळे कब्रस्तानात (Maimollem kabrastan) काही मशीन काम करत असल्याचे येथील स्थानिकांना आढळून आले. या घटनेची माहिती स्थानिकांनी वास्को आमदार कृष्णा साळकर आणि वास्को पोलिसांनी दिली. स्थानिकांनी सुरू असलेले काम बंद पाडले. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रेल्वे प्रशासनाचे कंत्राटदार कब्रस्तानात काम करत होते. त्यांनी चार ते पाच कबरींचे नुकसान केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, यावेळी मोठ्या प्रमाणावर जमाव मायमोळे कब्रस्तानात गोळा झाला होता व परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, वास्को आमदार कृष्णा साळकर यांनी याप्रकरणी एक बैठक बोलवण्याची सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिल्हा पंचायतीचे नवे कारभारी! रेश्मा बांदोडकर उत्तर गोवा तर सिद्धार्थ गावस देसाई दक्षिण गोव्याच्या अध्यक्षपदी विराजमान

गोव्यात 'थर्टी फर्स्ट'चा जल्लोष! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'हे' आहेत सर्वोत्तम पार्टी डेस्टिनेशन्स

Saudi Arabia Airstrike: मध्यपूर्वेत युद्धाचा भडका! सौदीचा येमेनवर ताबडतोड हवाई हल्ला; UAE कडून आलेली शस्त्रास्त्रांची जहाजे उद्ध्वस्त Watch Video

Sara Tendulkar In Goa: सचिनची लेक सारा गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद, बीच लूक चर्चेत; पाहा व्हिडिओ

Surykumar Yadav: "सूर्या मला खूप मेसेज करायचा" प्रसिध्द अभिनेत्रीच्या दाव्यानं क्रिकेट विश्वात खळबळ Watch Video

SCROLL FOR NEXT