Kiran Kandolkar, Juvem Nadora Bridge Dainik Gomantak
गोवा

Juvem Bridge: श्रेयवादामुळे 'जुवे पुलाचे' काम रखडले! कांदोळकरांची टीका; आमदार हळर्णकरांवर केले आरोप

Juvem Nadora Bridge: माजी आमदार किरण कांदोळकर यांनी काल पदपूलस्थळी पत्रकार परिषद घेवून सरकार तसेच मंत्री तथा थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकरांवर टीका केली.

Sameer Panditrao

Juvem Nadora iron footbridge closed

म्हापसा: राण्याचे जुवे-नादोडा येथील ३८ वर्षे जुना लोखंडी पदपूल मोडकळीस आल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी, बेटावरील जवळपास २५० लोकांना याचा फटका बसला आहे. कारण पदपुलावर गाडी नेण्यास बंदी घातल्याने लोकांना जीव मुठीत घेऊन चालत या कमकुवत पुलावरून जावे लागत आहे.

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी काल पदपूलस्थळी पत्रकार परिषद घेवून सरकार तसेच मंत्री तथा थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकरांवर टीका केली. ते म्हणाले की, गेल्या २०१५ मध्ये हा पदपूल नव्याने बांधण्यासाठी आपण हालचाली केल्या होत्या.

मात्र, मागील १० वर्षे हळर्णकरांनी आवश्यक उपाययोजना किंबहुना पदपुलाच्या कामाचे श्रेय मला मिळणार या तिरस्काराच्या भावनेने सदर पदपूल उभारण्यासाठी पाठपुरावा केला नाही, असा आरोप कांदोळकरांनी केला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

‘अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू’

थिवी येथील प्रस्तावित विद्यापीठ प्रकल्पाला ग्रामसभेच्या माध्यमातून होणाऱ्या विरोधाकडे दुर्लक्ष करून सरकार हा प्रकल्प राबवू पाहात आहे. हा मोठा जमीन घोटाळा असून सरकार मनमानी करून जमीन संपादनाचे काम करू पाहात आहे. सरकारने या हालचाली न थांबविल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा माजी आमदार किरण कांदोळकर यांनी दिला.

‘विकासकामांत राजकारण नको’

मुळात २०१५ मध्ये या पदपुलासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यानुसार मी फाईल दिली होती. प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती, परंतु हा प्रकल्प कांदोळकरांचा म्हणून विद्यमान आमदारांनी या पुलाचा पाठपुरावा सरकार दरबारी केला नाही. या पदपुलाचे श्रेय कांदोळकरांना मिळणार म्हणून हळर्णकरांनी पाठपुरावा केला नाही. मुळात विकासकामात मंत्री किंवा सरकारने राजकारण आणू नये, असे कांदोळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT