court Dainik Gomantak
गोवा

Goa News: आमदार अपात्रता सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती महेश सोनक यांचा नकार

काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांविरुद्ध अपात्रतेप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी घटनेनुसार 90 दिवसांच्या आत घेण्याचे निर्देश द्यावेत,या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्तींनी नकार दिला.

दैनिक गोमन्तक

Goa News: काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांविरुद्ध अपात्रतेप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी घटनेनुसार 90 दिवसांच्या आत घेण्याचे निर्देश द्यावेत.

यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी आली असता न्यायमूर्ती महेश सोनक यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे ही याचिका आता विशेष खंडपीठासमोर सुनावणीसाठी वर्ग करण्यात येणार आहे.

चोडणकर यांनी सभापतींकडे आमदार अपात्रता याचिका गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला सादर केली आहे. घटनेनुसार सभापतींसमोरील अपात्रता याचिकेवरील सुनावणी 90 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे.

पण या याचिकेला तीन महिने होत आले तरी याचिकेतील प्रतिवादी असलेल्या त्या आठ आमदारांना सभापतींनी अजूनही नोटीस बजावलेली नाही व सुनावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे सभापतींना ही सुनावणी 90 दिवसांत पूर्ण करण्याची सूचना करावी अशी विनंती चोडणकर यांनी याचिकेत केली आहे.

दरम्यान, यापूर्वी सभापती तवडकर यांनी चोडणकर यांच्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी घटनेनुसार 90 दिवसांत पूर्ण केली जाईल असे वेळोवेळी पत्रकारांनी विचारलेल्या उत्तर देताना सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात अजून त्यावरील सुनावणी सुरू केलेली नाही.

चोडणकर यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत सभापतींसह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठही आमदारांना प्रतिवादी केली आहे. त्यामध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक, संकल्प आमोणकर व आलेक्स सिक्वेरा यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT