Jr. NTR Devara 
गोवा

Jr. NTR, जान्हवी आणि सैफच्या 'देवरा'चे गोव्यात होणार शूटिंग; दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ

चित्रपटाचे पहिले शेड्यूल उरकले असून, चित्रपटाच्या शूटिंगचे दुसरे शेड्यूल गोव्यात होणार आहे

Pramod Yadav

'RRR' ने देश आणि जगात धुमाकूळ घातल्यानंतर, ज्युनियर NTR लवकरच लोकांचे मनोरंजन करण्यासाठी परत येत आहे. Jr. NTR ने त्याच्या पुढील अ‍ॅक्शनपॅक्ड 'देवरा' चित्रपटावर काम सुरू केले आहे, हा त्याचा 30 वा चित्रपट आहे.

'देवरा'चे शूटिंग सुरू झाल्यापासून ज्युनियर एनटीआरचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या उर्वरीत भागाचे शूटिंग गोव्यात होणार आहे.

देवरा सिनेमात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, शाइन टॉम चाको आणि मेका श्रीकांत यांंच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाचे पहिले शेड्यूल उरकले असून, चित्रपटाच्या शूटिंगचे दुसरे शेड्यूल गोव्यात होणार आहे आणि 24 ऑक्टोबरपासून शूटिंग सुरू होणार आहे.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे दुसरे शेड्यूल सुरू होईल. चित्रपटाचे दुसरे शेड्यूल वर्षाच्या शेवटपर्यंत चालणार असल्याचे सांगितले जात आहे. कोर्टाला सिवा दिग्दर्शित 'देवरा' हा एक तेलुगु अ‍ॅक्शन ड्रामा असून हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचा पहिला भाग, 'देवरा भाग - 1, पाच एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

जान्हवी कपूरचा हा पहिला टॉलिवूड चित्रपट असून, ती देवराच्या माध्यमातून दक्षिण चित्रपट उद्योगात पदार्पण करत आहे.

चित्रपटाचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर, सिनेमॅटोग्राफर रथनवेलू, संपादक श्रीकर प्रसाद आणि कला दिग्दर्शक साबू सिरिल यांचा समावेश आहे. दरम्यान, वर्क फ्रंटवर, SS राजामौलीच्या 'RRR' मध्ये शेवटचे दिसलेले Jr NTR यांचे काही प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत ज्यात 'देवरा 2', 'वॉर 2' यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT