Goa Latest News Dainik Gomantak
गोवा

'टिळकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी पत्रकारिता करावी'

पत्रकार दिनाचे महत्त्व अधोरेखित करायचे असेल तर टिळकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी पत्रकारिता करावी.

दैनिक गोमन्तक

पत्रकार दिनाचे महत्त्व अधोरेखित करायचे असेल तर टिळकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी पत्रकारिता करावी. पूर्वीची पत्रकारिता व सध्या पत्रकारितेमध्ये होत असलेले परिवर्तनामुळे मुल्ये हरवत चाललेली आहेत. एकावेळी समाजात पत्रकाराबद्दल असलेला विश्वास व धाक आज राहिलेला नाही. यासाठी काही पत्रकार जबाबदार आहेत.

पत्रकारितेला गत वैभव मिळवून द्यायचे असेल तर पत्रकारांनीच आपली प्रामाणिक पत्रकारिता करून मिळवावे लागेल. याचा शुभारंभ मुरगाव पत्रकार लेखक संघाच्या वतीने होईल व अशा प्रकारच्या प्रामाणिक पत्रकारांना माझा सदैव पाठिंबा असेल असे मत नागोवा पंचायतीचे बिनविरोधी निवडून आलेले पंच प्रमुख पाहुणे ॲड दिलेश्वर नाईक यांनी आज मुरगाव पत्रकार लेखक संघाव तर्फे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे ॲड दिलेश्वर नाईक, मुरगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील शेट, सरचिटणीस प्रदीप नाईक, खजिनदार सुभाष राव, भरत तळणकर, केली फुर्तादो, जगदीश दुर्भाटकर, अनंत मांजरेकर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष सुनील शेट यांनी केले. प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन तर सुभाष राव यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT