Joshua D'Souza Dainik Gomantak
गोवा

अतिरिक्त जबाबदारीमुळे ‘तो’ ताबा स्वीकारला नव्हता : जोशुआ डिसोझा

जीएसआयडीसीच्या उपाध्यक्षपदाचा ताबा न स्वीकारण्याबाबत स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

म्हापसा : भाजपने मला इतरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचा मी सरचिटणीस आहे. याशिवाय मागील दोन महिन्यांपासून मला वारंवार राज्याबाहेर कामानिमित्त जावे लागले. माझ्यावर अतिरिक्त राष्ट्रीय जबाबदारी असल्यानेच मी जीएसआयडीसीच्या उपाध्यक्षपदाचा ताबा घेतला नव्हता आणि मला इतर जबाबदारी मिळणार आहे, अशी माहिती मिळाल्याने मी थोडावेळ थांबलो, असे म्हणत आमदार जोशुआ डिसोझा यांनी जीएसआयडीसीच्या उपाध्यक्षपदाचा ताबा न स्वीकारण्याबाबत स्पष्टीकरण दिले.

जोशुआ डिसोझा यांची मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी (पीडीए) नियुक्ती केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, पक्षाने राष्ट्रीय जबाबदारी दिल्याने मला अनेकदा गुजरात, महाराष्ट्राला जावे लागले. त्यामुळे कामात जरा जास्त व्यस्त राहिलो. मुरगाव पीडीए बाबत, मला अद्याप अधिसूचना मिळालेली नाही. पण, भाजपाने आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही जबादारी सोपविल्याने मी पक्षाचा आभारी आहे.

मंत्री विश्वजित राणे यांनीही माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. या पदाला मी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीन. माझ्या कारर्किदीत मुरगावातील लोकांना स्वच्छ प्रशासन देण्यासाठी मी कटिबद्ध असेन. शिवाय मुरगावातील सर्व लोकप्रतिनिधीं व लोकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे जोशुआ म्हणाले.

कायद्यानुसार कारवाई होऊ दे
विरोधी पक्षनेता मायकल लोबो यांना सरकार हेतुपरस्पर लक्ष्य करीत असल्याच्या प्रश्नावर बोलताना जोशुआ म्हणाले की, जर बेकादेशीर बांधकाम असल्यास ते जमिनदोस्त होणारच. कायद्यानुसार कारवाई होऊ देत. जो लोकप्रतिनिधी असतो, त्याने नेहमीच कायदेशीर राहायला पाहिजे. जर कायदेशीर राहिल्यास असे प्रश्नच निर्माण होत नसतात, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

लोबोंना लक्ष्य करण्याचा प्रश्नच नाही
मायकल लोबो यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्याचा प्रश्नच नाही. जेव्हा ते इतरांना जाणूनबुजून लक्ष्य करायचे, तेव्हा माध्यमांनी हा प्रश्न त्यांना कधीच विचारला नव्हता. आता लोबो यांना याचा सामना करावा लागत असल्याने ते स्वतःला पीडित म्हणताहेत, अशा शब्दांत जोशुआ यांनीही लोबो यांच्यावर तोंडसुख घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT