Joshua Dsouza Dainik Gomantak
गोवा

पुन्हा अपेक्षाभंग, ज्योशुआ डिसुझांना मंत्रिपदाची हुलकावणी

साधनसुविधा महामंडळ उपाध्यक्षपदावरच मानावे लागले समाधान

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी राज्य मंत्रिमंडळात स्वत:ला मंत्रिपद मिळावे यासाठी विविध माध्यमांतून बरेच प्रयत्न केले असले, तरी शेवटपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळूच शकले नाही. अखेरीस त्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षपदाखाली कार्यरत असलेल्या गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले आहे.

भाजपच्या म्हापशातील (Mapusa) काही कार्यकर्त्यांनी पक्ष पातळीवर प्रयत्न करून ज्योशुआ डिसोझा यांना मंत्रिपद मिळावे, अशी मागणी केली होती. परंतु त्यासंदर्भात कुणीही उघडरीत्या पुढे आला नव्हता. असे असले, तरी ज्योशुआ डिसोझा पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, की म्हापसा ही उत्तर गोव्याची राजधानी असल्याने या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी माझी अपेक्षा असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. पक्षाने त्यासंदर्भात घेतलेला कोणताही निर्णय मला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

सध्या अन्य आमदारांच्या तुलनेने ज्योशुआ डिसोझा यांना गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष हे साधेसुधे पद दिल्याने त्यांची एका परीने भाजपने तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोळवणच केली आहे. त्यातच समाधान मानण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यासमोर अन्य पर्यायही नाही, ही वस्तुस्थिती आहे. अन्य आमदारांना मात्र विविध महामंडळांची अध्यक्षपदे बहाल करण्यात आली आहेत. त्यामुळे आमदार ज्योशुआ डिसोझा यांना एका परीने सध्या दुधाची तहान ताकावरच भागवावी लागली आहे.

विविध महामंडळांवर अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या आमदारांमध्ये आलेक्स रेजिनाल्ड (गोवा औद्योगिक विकास महामंडळ), गणेश गावकर (गोवा पर्यटन विकास महामंडळ), दाजी साळकर (दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरण), जेनिफर मोन्सेरात (उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण), प्रेमानंद शेट (फलोत्पादन महामंडळ), उल्हास तुयेकर (कदंब परिवहन महामंडळ), प्रवीण आर्लेकर (हस्तकला महामंडळ), डॉ. चंद्रकांत शेट्ये (माहिती तंत्रज्ञान महामंडळ), जित आरोलकर (गोवा गृहनिर्माण मंडळ), डॉ. दिव्या राणे (वन विकास महामंडळ), आंतोनिओ वाझ (खादी विकास मंडळ) यांचा समावेश आहे. परंतु, ज्योशुआ डिसोझा यांना केवळ उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले आहे.

माजी उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र असलेले ज्योशुआ डिसोझा यांनी त्याच जागेवर अर्थात म्हापशातून वर्ष 2019 मध्ये भाजपच्या (BJP) उमेदवारीच्या साहाय्याने पोटनिवडणूक लढवली होती व त्यात ते विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना आमदारपदाचा सुमारे अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळाला होता. त्यानंतर यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते त्याच पक्षाच्या उमेदवारीच्या साहाय्याने आमदारपदी पुन्हा निवडून आले आहेत.

स्वत:चे पिता राज्य मंत्रिमंडळात दीर्घ काळ कार्यरत होते व त्यामुळे निदान आता तरी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी ज्योशुआ डिसोझा यांना अपेक्षा होती. तथापि, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात ज्येष्ठतम मंत्री-आमदारांना प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबल्याने ज्योशुआ डिसोझा यांची इच्छा साकार होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT