Panchayat Minister Godinho Gomantak Digital Team
गोवा

Vasco : चिखलीतील जॉगर्स पार्कचे लवकरच उद्‍घाटन : गुदिन्हो

पंचायत मंत्री गुदिन्हो यांच्या सहकार्यामुळे सदर पंचायत अधिकाअधिक विकास कामे होत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco : चिकोळणा बोगमाळो पंचायत क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच बोगमाळो येथील तलावात नौकाविहार ( बोटिंग) सुरू करण्यात येणार असल्याचे पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी सांगितले. चिखली पंचायत क्षेत्रातील जॉगर्स पार्कचे नूतनीकरण व दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने लवकरच उद्‍घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बोगमाळो किनाऱ्यावरील नवीन संरक्षण भिंतीचे तसेच सौंदर्यीकरणाचे उद्‍घाटन मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत उपसंचालक प्रसिध्द नाईक, मुरगावचे गटविकास अधिकारी प्रीतेश शेट्ये, बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लोरेना कुन्हा, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, बोगमाळीचे पंच व इतर मंडळी उपस्थित होते. संरक्षण भिंत बांधताना तेथे लोकांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय करण्यात आली आहे.

बोगमाळोसारख्या सुंदर व शांत गावात पर्यटनाला चालना देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या परिसराला अधिकाअधिक सुशोभित करण्यासाठी तेथील तारांकित हॉटेल व्यावसायिकची मदत घेतली जाणार आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले. प्रसिध्द नाईक यांनी सांगितले की, लोरेना कुन्हा यांच्या कार्यकाळात सदर संरक्षण भिंत कोसळल्यावर त्यांनी सतत पाठपुरवा करून नवीन संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रयत्न केले होते.

पंचायत मंत्री गुदिन्हो यांच्या सहकार्यामुळे सदर पंचायत अधिकाअधिक विकास कामे होत आहेत. सरपंच महाले यांनी चिकोळणा बोगमाळी पंचायतीला मंत्री गुदिन्हो यांचे सतत सहकार्य असल्याचे सांगितले. त्यांच्या सहकार्याने या पंचायतीमध्ये अधिकाअधिक विकासकामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT