Joggers Park Dainik Gomantak
गोवा

Joggers Park Fatorda : सौर दिव्‍यांनी उजळले फातोर्ड्याचे जॉगर्स पार्क

गोमन्तक डिजिटल टीम

Joggers Park Fatorda : मडगाव, अखेर फातोर्डा जॉगर्स पार्क सौर दिव्‍यांनी उजळले आहे. या जॉगर्स पार्कला यापूर्वी पथदीपांची व्‍यवस्‍था होती. मात्र, त्‍यावर मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्‍याने सरकारने सौर दिव्‍यांचा वापर करण्‍यावर भर दिला व आता प्रत्‍यक्षात हे जाॅगर्स पार्क सौर दिव्‍यांनी उजळून निघाले आहे.

फातोर्डा जाॅगर्स पार्कवर भल्‍या पहाटे लोक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. त्‍या लाेकांची तसेच सायंकाळी उशिरापर्यंत वॉकिंगसाठी येणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे.

लठ्ठपणा तसेच मधुमेह व अन्‍य आजार असलेले रुग्‍ण डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार फातोर्डा जॉगर्स पार्कवर वॉकिंगसाठी येत असतात. केवळ फातोर्डा परिसरातीलच नव्‍हे, तर कुडतरी, मडगाव, नावेली या ठिकाणाहूनही लोक जॉगिंग करण्‍यासाठी येेथे येत असतात.

या जॉगर्स पार्कची देखभाल ठेवणे आवश्‍‍यक बनले आहे. आता सौर दिव्‍यांनी काही प्रमाणात चांगली सोय केली असली तरी अन्‍य बाबींकडे लक्ष देण्‍यात यावे अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT