Goa Jobs Scam Dainik Gomantak
गोवा

नोकऱ्या लागल्या; ‘आरटीआय’अंतर्गत माहिती मागवल्याने आरोग्य खात्यात गोंधळ

भ्रष्टाचारी नोकर भरतीमुळे प्रामाणिक, गरजू, पात्रता असलेले उमेदवार निराश

दैनिक गोमन्तक

गोवा : गोवा आरोग्य खात्यात डिसेंबर 2021 मध्ये भरतीची प्रक्रीया राबविण्यात आली होती. त्यावेळी आरोग्य खात्यात अनेकजण रुजू झाले होते. पण त्या भरतीचा निकाल आरोग्य खात्याने आता जाहीर केल्याने आरोग्य खात्यात गोंधळ काहीतरी काळबेरं झाल्याची चर्चा रंगली आहे. आरोग्य खात्याच्या त्या भरतीविषयी काही जणांनी ‘आरटीआय’ (RTI) अंतर्गत माहिती मागवली होती. त्याप्रमाणे आता आरोग्य (Health) उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी जाहीर केली आहे. यातून खात्यातील सावळा गोंधळ उघड होण्याची शक्यता आहे.

यादरम्यान, काही तास ओलंडताच काही अज्ञातांनी आरोग्य खात्याच्या इमारतीबाहेर लावलेली यादीच फाडून टाकली. यामुळे आरोग्य खात्याच्या त्या भरतीविषयी वरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.

यादरम्यान भाजप (BJP) सरकारवर ते ठराविक मतदारसंघातील उमेदवारच निवडले जात असल्यावरून अरोप होते. यावरून काँग्रेस (Congress) पक्षाने भाजपवर आक्रमक भूमिका घेत गंभीर आरोप केले होते. तर पणजीत पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते दिंगबर कामत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी, प्रामाणिक आणि गुणवान उमेदवारांवर होणारा हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असे म्हटलं होतं. तर या अशा भ्रष्टाचारी नोकर भरतीमुळे प्रामाणिक, गरजू, पात्रता असलेले उमेदवार निराश होत आहेत. अपात्र आणि लाच देणारे उमेदवार निवडण्यात येत असल्याची टीका ही केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT