Jit Arolkar MGP Dainik Gomantak
गोवा

Jit Arolkar : समर्थक असो वा विरोधक; सर्वांची कामं करणार

पंचायत निवडणुकीत मतदान केल्यानंतर मगोप आमदार जीत आरोलकर यांचं वक्तव्य

आदित्य जोशी

Jit Arolkar : समर्थक असो वा विरोधक; सर्वांची कामं करणार असल्याचं मगोपचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी म्हटलं आहे. पंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आरोलकर यांनी स्थानिक राजकारणावरही भाष्य केलं आहे.

ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावातील सर्वसामान्य लोकांची निवडणूक असते. ही काही विधानसभा, लोकसभा निवडणूक नाही. त्यामुळे यात आपला दुसरा असं काही नसतं. सगळे आपल्यासाठी समान असून जेवढे लोक पंच म्हणून निवडून येतील त्यांची आमदार या नात्याने काम करण्याची आपली जबाबदारी असल्याचंही जीत आरोलकर यांनी स्पष्ट केलं आहे.

काही वार्डामध्ये 4 ते 8 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र जो निवडून येईल तो त्या भागाचा नेता असेल. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता आपण सर्वांनाच मदत करणार असून आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही जीत आरोलकर यांनी स्पष्ट केलं आहे. जीत आरोलकर यांच्या याच वक्तव्याची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. मांद्रे भागात मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT