Goa Crime Dainik Go0mantak
गोवा

Goa Crime: कुर्टी येथे घर फोडले; दीड लाखांचा ऐवज लंपास

घटनास्थळी श्वानपथक दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

आज कुर्टी येथील अंतृज नगर भागातील विठ्ठल प्रभु यांच्या घरामध्ये चोरी झाली असून या चोरीमध्ये चोरट्याने घरातील सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभु यांचे घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने हा डल्ला मारला आहे.

(Jewels worth one and a half lakhs have been stolen from the house at kurti ponda )

मिळालेल्या माहितीनुसार आज कुर्टी तालुका फोंडा येथील अंतृज नगर भागातील एका घरामध्ये चोरी झाली असून या चोरीत अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यासाठी श्वानपथकाची मदत घेतली जात आहे.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की,या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. त्यामूळे लवकरच तो पुर्ण होईल. असे असले तरी या चोरीमुळे अंतृज नगर परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक परेश सिनारी करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT